भरधाव वाहनाची धडक; एकजण जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:33 AM2021-01-09T04:33:54+5:302021-01-09T04:33:54+5:30
शैलेश चांभारे हा ८ जानेवारी रोजी सकाळी समृद्धी महामार्गावरील सर्व्हिस रोडवरून दुचाकीने शेतात चालला होता. दरम्यान गौण खनिज (मुरूम) ...
शैलेश चांभारे हा ८ जानेवारी रोजी सकाळी समृद्धी महामार्गावरील सर्व्हिस रोडवरून दुचाकीने शेतात चालला होता. दरम्यान गौण खनिज (मुरूम) वाहतूक करणाऱ्या भरधाव वाहनाने दुचाकीस जबर धडक दिली. त्यात शैलेश जागीच ठार झाला. हा अपघात एवढा भीषण होता की, शैलेश सुमारे १५ ते २० फूट फरफटत गेला. तसेच मोटारसायकलचा पूर्णत: चुराडा झाला.
.....................
बॉक्स :
महामार्गाच्या दुतर्फा शेती असणाऱ्यांचा जीव धोक्यात
वनोजा शेतशिवारातून गेलेल्या समृद्धी महामार्गाच्या दुतर्फा शेकडो एकर शेती आहे. शेतांमध्ये जाण्याकरिता शेतकऱ्यांना महामार्ग ओलांडावा लागतो. त्यामुळे संरक्षणात्मक उपाययोजना कराव्या, अशी मागणी प्रशासनाकडे वेळोवेळी करण्यात आली; मात्र त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून, ८ जानेवारीला याच कारणावरून एकाचा नाहक बळी गेल्याचा सूर उमटत आहे.
...................
पोलिसांच्या मध्यस्थीनंतर मृतदेहाचे शवविच्छेदन
समृद्धी महामार्गावर घडलेल्या अपघातात शैलेश चांभारे हा युवक ठार झाल्यानंतर संतप्त झालेल्या नातेवाइकांनी न्यायाची मागणी करत मृतदेह उचलण्यास नकार दिला. त्यामुळे काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. न्याय मिळवून देण्याचा विश्वास देत पोलिसांनी केलेल्या मध्यस्थीनंतर वाद निवळून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.