ताण कमी करण्यासाठी खाकीने जपला छंद !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:40 AM2021-05-10T04:40:33+5:302021-05-10T04:40:33+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : वाढती लोकसंख्या, त्यातच कमी मनुष्यबळ आणि विविध प्रकारचे बंदोबस्त यामुळे कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ...

Hobby with khaki to reduce stress! | ताण कमी करण्यासाठी खाकीने जपला छंद !

ताण कमी करण्यासाठी खाकीने जपला छंद !

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

वाशिम : वाढती लोकसंख्या, त्यातच कमी मनुष्यबळ आणि विविध प्रकारचे बंदोबस्त यामुळे कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवताना पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण वाढला. कोविडच्या परिस्थितीत हा ताण आणखीनच वाढला आहे. अशा परिस्थितीत डोक्यावरचा ताण दूर सारत काही पोलीस कर्मचारी आणि अधिकारी आपला छंद जोपासून कामाचा उत्साह वाढवत आहेत.

कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी सांभाळताना पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा अधिकाधिक वेळ खर्ची पडतो. त्यातच आता कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने रजाही नाहीत आणि साप्ताहिक सुट्टीवर अनेकवेळा गडांतर येते. असे असतानाही काही पोलीस अधिकारी व कर्मचारी कर्तव्य बजावत असतानाच आपले छंदही जोपासत आहेत. कुणी मॅरेथाॅन विजेता आहे तर कुणी बॉडी बिल्डिंग, गीत गायनाचा छंद जोपासण्यासाठी वेळ काढून ताण कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

००००

गायक ते कवी

शिरपूर पोलीस स्थानकाचे संतोष पाईकराव हे १९ वर्षांपासून पोलीस खात्यात आहेत. त्यांना गायनाचा छंद आहे. स्वत:चे मनोरंजन करण्यासाठी त्यांनी गायनाला सुरुवात केली. आज ते उत्तम गायक म्हणून ओळखले जातात. त्यांचे गाणे सोशल मीडियावर झळकले आहे. कवी म्हणूनही ते ओळखले जातात.

०००

मॅरेथाॅनमुळे ओळख

मालेगाव पोलीस स्थानकाचे मनोहर वानखडे हे वाहतूक शाखेत कार्यरत आहेत. ते लहानपणापासूनच धावपट्टू असून, महाविद्यालयीन जीवनात अमरावती विद्यापीठातून सलग तीनवेळा ‘मॅरेथाॅन’मध्ये प्रथम क्रमांक पटकावून ते ‘कलरकोट’चे मानकरी ठरले आहेत. फावल्या वेळात सकाळी ते धावण्याचा छंद जोपासतात.

००००

व्यायामातून ताण निवळतोय

आर्थिक गुन्हे शाखा, वाशिम येथे कर्तव्यावर असलेले विनोद मार्कंडे यांना लहानपणापासूनच व्यायामाचा छंद असून, शरीरसौष्ठव स्पर्धेतही त्यांनी नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला. कर्तव्य बजावताना कुठल्या ना कुठल्या कारणाने आलेला ताण कमी करण्यासाठी ते नियमित व्यायामाचा छंद जोपासत आहेत.

००००००००

रेसर बाईक बॉय...

‘रेसर बाईक’ हा एक वेगवान साहसी खेळ म्हणून ओळखला जातो. मालेगाव पोलीस स्थानकाचे कर्मचारी अमोल पाटील हे पोलीस विभागात ‘रेसर बाईक’ बॉय म्हणून ओळखले जातात. वेळातील वेळ काढून आताही ते रेसर बाईकचा छंद जोपासत आहेत.

०००००

००००००००००००००००

एकूण पोलीस, अधिकारी १,४९०

पोलीस अधिकारी ९२

पोलीस कर्मचारी १,३९८

Web Title: Hobby with khaki to reduce stress!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.