शहर विकासावर चर्चेसाठी त्वरित विशेष सभेचे आयोजन करा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:28 AM2021-07-18T04:28:52+5:302021-07-18T04:28:52+5:30
निवेदनात असे नमूद केले आहे की, शहरात होत असलेल्या निकृष्ट दर्जाच्या विकासकामांबाबत कार्यवाही ती चांगल्या पद्धतीने पूर्ण करणे गरजेचे ...
निवेदनात असे नमूद केले आहे की, शहरात होत असलेल्या निकृष्ट दर्जाच्या विकासकामांबाबत कार्यवाही ती चांगल्या पद्धतीने पूर्ण करणे गरजेचे आहे. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेंतर्गत जिल्हाधिकाऱ्यांकडे आलेल्या ६ कोटी रुपयांच्या निधीतून कामे निश्चित करण्यासाठी विशेष सभा त्वरित बोलविण्यात यावी व या योजनेंतर्गत कामे निश्चित करून तसा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवावा. शहरातील इतर अपूर्ण व रखडलेली कामे तत्काळ पूर्ण करण्यात यावीत. कामे सुरू करण्यास काही अडचणी असतील तर विशेष सभेसमोर सर्व विकासाचे विषय चर्चा करण्यासाठी ठेवण्यात यावेत. त्यामध्ये वाशिम शहरात मागील कित्येक वर्षांपासून सुरू असलेले नाट्यगृहाचे काम काम त्वरित पूर्ण करावे. अकोला नाका परिसरातील टेंपल गार्डनची देखभाल दुरुस्ती करून ते जनसेवेत रुजू करावे, अकोला नाका ते पाटणी चौक रस्त्याचे रखडलेले काम त्वरित पूर्ण करावे. या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी व मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. निवेदनावर न. प. उपाध्यक्ष भानुप्रतापसिंह ठाकूर, भाजपा गटनेत्या तथा नगरसेविका रेखा मिठूलाल शर्मा, नगरसेवक गुरुनामसिंह गुलाटी, करुणा कल्ले, रुपेश वाघमारे, आम्रपाली ताजणे, आशा खटके, गौतम भालेराव, पाणीपुरवठा सभापती प्रभाकर काळे, राधिका पोटफोडे, बांधकाम सभापती गौतम सोनोने, सविता इंगोले, अमित मानकर, राहुल तुपसांडे, चंदा जिवनाणी, बाळू मुरकुटे, शेख फिरोज शेख ईस्माईल, कुसुम गोरे, हसिना चौधरी, हिना मुब्बासिर, मो. मुज्जोमीलोद्दीन मो. शहाबुध्दीन आदी नगरसेवकांच्या सह्या आहेत.
^^^^^^^^
रस्त्यावरील खड्ड्यांकडे दुर्लक्ष
वाशिम शहरातील रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. यामुळे नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता ही समस्या दूर करण्यासाठी आमदार लखन मलिक यांनी १६ जुलै रोजी शहरात आंदोलन केले. तथापि, अद्यापही त्याची दखल घेण्यात आली नसून, या आंदोलनाच्या अनुषंगाने त्वरित कार्यवाही करावी. अशीही मागणी निवेदनात करण्यात आली आहे.