चिमुकल्यांनी केली प्लास्टिक कचऱ्यांची होळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 03:48 PM2018-09-15T15:48:13+5:302018-09-15T15:48:46+5:30
वाशिम: स्थानिक जानकीनगर येथील बाल गणेश मंडळाच्या वतीने १५ सप्टेंबर रोजी ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानांतर्गत चिमुकल्यांनी परिसरातील प्लास्टिक कचरा गोळा करुन त्याची होळी केली, तसेच महिला मंडळीनेही स्वच्छता अभियान राबवित परिसर स्वच्छ केला.
लोकमत न्यूज नेटवर्क

‘स्वच्छता ही सेवा’ अभियानांतर्गत जानकी नगर येथील बालक, बालिकांनी प्लास्टिकमूक्त अभियानात उत्साहाने सहभाग घेत पर्यावरणाला घातक असलेल्या प्लास्टिकबाबत जनजागृती केली, तसेच परिसरातील प्लास्टिक कचरा गोळा करून त्याची होळी केली. दरम्यान, महिलांनी स्वच्छता अभियान राबवून स्वच्छतेचा जागर केला. महिलांनी संपूर्ण परिसर खराट्याने झाडून स्वच्छ केला. सदर अभियानात भारती सोमाणी, निता दहात्रे, मते, खानझोडे, गायकवाड, दहात्रे, पिंकू ताजणे, ताजणे, विमलताई साबळे, राधिका भट्टड, शिवाल, डॉ. दहात्रे, वाढवे, आदिंनी सहभाग घेतला. जानकीनगर बाल गणेशोत्सव मंडळाच्यावतीने विविध सामाजीक उपक्रम राबविण्यात येतात यंदाही विविध वयोगटाकरीता या मंडळाकडून नृत्यस्पर्धा तसेच पर्यावरण संरक्षण काळाची गरज, बेटी बचाव बेटी पढाव या विषयावर खुल्या निबंध स्पर्धेेचे आयोजन करण्यात आले आहे.