घरपोच गॅस सिलेंडरच्या वाहतूक खर्चाचा भुर्दंड ग्राहकांच्या माथी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2017 07:39 PM2017-10-15T19:39:45+5:302017-10-15T19:41:20+5:30
मोबाईलव्दारे बुकींग केलेल्या ग्राहकांना गॅस एजन्सीकडून घरपोच सिलेंडर दिले जाते. मात्र, यापोटी २० ते ३० रुपये रक्कम आकारली जात असून त्याचा भुर्दंड ग्राहकांनाच सोसावा लागत आहे. स्वत: एजन्सीतून गॅस-सिलेंडर आणल्यावरही रिबीटचा परतावा न देता तेवढीच रक्कम आकारली जात असल्याने ग्राहकांमध्ये रोष व्यक्त होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : मोबाईलव्दारे बुकींग केलेल्या ग्राहकांना गॅस एजन्सीकडून घरपोच सिलेंडर दिले जाते. मात्र, यापोटी २० ते ३० रुपये रक्कम आकारली जात असून त्याचा भुर्दंड ग्राहकांनाच सोसावा लागत आहे. स्वत: एजन्सीतून गॅस-सिलेंडर आणल्यावरही रिबीटचा परतावा न देता तेवढीच रक्कम आकारली जात असल्याने ग्राहकांमध्ये रोष व्यक्त होत आहे.
वाशिम शहरात गॅस-सिलेंडरचा पुरवठा करणाºया एजन्सीकडून भ्रमणध्वनीवर बुकींग केल्यानंतर घरपोच सिलेंडर दिले जाते. यासाठी आकारल्या जाणाºया ठराविक रकमेत वाहतूक खर्चाचाही समावेश असतो. असे असताना सिलेंडर पोहचविणारे वाहनधारक ग्राहकांकडून पावतीवरील रकमेव्यतिरिक्त प्रती सिलेंडर २० ते ३० रुपये अधिक घेतले जात असल्याचे दिसून येत आहे.
घरपोच गॅस सिलेंडर पोहचविणे, ही संबंधित त्या-त्या गॅस एजन्सीची जबाबदारी असून यासाठी अतिरिक्त चार्जेस लावण्याचे कुठलेच प्रावधान नाही. तरीदेखील वाहतूकीचा खर्च आकारला जात असेल तर ग्राहकांनी तक्रारी नोंदवाव्यात. त्यावर निश्चितपणे कार्यवाही केली जाईल.
- डी.के.वानखेडे
जिल्हा पुरवठा अधिकारी, वाशिम