‘ड्युटी’साठी ‘होमगार्डस्’ आक्रमक; जिल्हा समादेशक कार्यालयास घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2019 04:58 PM2019-02-18T16:58:04+5:302019-02-18T16:58:21+5:30

वाशिम : सामाजिक उपक्रमात पोलिसांच्या बरोबरीने सेवा देणाºया जिल्ह्यातील गृहरक्षक दलाच्या ३५० कर्मचाºयांची शारिरीक चाचणी घेवूनच पुर्ननियुक्ती देण्याची भुमिका प्रशासनाने घेतली.

'Home guards' aggressive for 'duty' in washim district | ‘ड्युटी’साठी ‘होमगार्डस्’ आक्रमक; जिल्हा समादेशक कार्यालयास घेराव

‘ड्युटी’साठी ‘होमगार्डस्’ आक्रमक; जिल्हा समादेशक कार्यालयास घेराव

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : सामाजिक उपक्रमात पोलिसांच्या बरोबरीने सेवा देणाºया जिल्ह्यातील गृहरक्षक दलाच्या ३५० कर्मचाºयांची शारिरीक चाचणी घेवूनच पुर्ननियुक्ती देण्याची भुमिका प्रशासनाने घेतली. यामुळे ‘ड्युटी’ मिळणार नसल्याच्या मुद्यावरून संतापलेल्या सर्व कर्मचाºयांनी एकत्र येवून जिल्हा समादेशक कार्यालयाला सोमवार, १८ फेब्रूवारी रोजी घेराव घातला. या आक्रमकतेपुढे अखेर प्रशासनाने नमते घेत कार्यरत गृहरक्षक दलाच्या कर्मचाºयांना ‘ड्युटी’ देण्याचे मान्य केले. 
गृहरक्षक दल हा पोलीस विभागाचा समकक्ष विभाग म्हणून शासनलेखी नोंद आहे. राज्याचा पोलीस महासंचालक दर्जाचा समादेशक गृहरक्षक दलावर निगराणी ठेवतो. असे असताना या विभागातील कर्मचाºयांना तुटपुंज्या मानधनावर काम करावे लागत असून विविध स्वरूपातील समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. यातही स्थानिक जिल्हा गृहरक्षक दलाच्या कार्यालयातील आघाव नामक लिपीकाने वरिष्ठांकडून गृहरक्षक दलातील सर्व कर्मचाºयांची शारिरीक चाचणी घेतल्यानंतरच पुर्ननियुक्ती देण्याचा आदेश असल्याचे सांगून सर्वांनाच ‘ड्युटी’ देण्याचे नाकारले. त्यामुळे संतापलेल्या गृहरक्षक दलाच्या कर्मचाºयांनी सोमवारी दुपारी आक्रमक पवित्रा अंगिकारत जिल्हा समादेशक कार्यालय गाठून प्रशासकीय अधिकारी व लिपीकास घेराव घातला. महिला कर्मचाºयांनीही यावेळी आक्रमक पाऊल उचलत प्रश्न न सुटल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला. त्यामुळे धास्तावलेल्या लिपिकाने व जिल्हा समादेशकांनी नमती बाजू घेत सर्व कर्मचाºयांना ‘ड्युटी’ देण्याची बाब मान्य केली. यावर संबंधित गृहरक्षक दलाच्या कर्मचाºयांचे समाधान झाल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.

Web Title: 'Home guards' aggressive for 'duty' in washim district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.