गृहकर्ज झाले स्वस्त, पण बांधकाम साहित्याचे भाव गगनाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:40 AM2021-07-29T04:40:32+5:302021-07-29T04:40:32+5:30
पहिल्यांदाच गृहकर्जाचे व्याजदर सर्वात नीचांकी पातळीवर येऊन पोहोचले आहेत. पण, दुसरीकडे सरकारचे थेट नियंत्रण नसल्याने बांधकाम साहित्याचे भाव प्रचंड ...
पहिल्यांदाच गृहकर्जाचे व्याजदर सर्वात नीचांकी पातळीवर येऊन पोहोचले आहेत. पण, दुसरीकडे सरकारचे थेट नियंत्रण नसल्याने बांधकाम साहित्याचे भाव प्रचंड वाढले आहेत.
----------
गावापासून दूर घरे स्वस्त पण, जाणे - येणे महाग
शहरापासून दूर ग्रामीण भागात उभारण्यात येत असलेल्या इमारतीमध्ये घर स्वस्त आहे. परंतु व्यवस्थित रस्ते नसणे व जाण्यायेण्याचा खर्च जास्त असल्याने घर घेण्याबाबत नागरिक मागेपुढे पाहत आहेत.
बँकेच्या गृहकर्जाचे व्याजदर कमी आहेत, या संधीचा फायदा घेत घर खरेदी करण्याचा अनेकांनी विचार केला हाेता, पण, बांधकाम साहित्याचे भाव वाढल्याने घराच्या किमती वाढत आहेत. यामुळे घर खरेदीचा बेत अनेकांनी स्थगित केला आहे.
ग्राहक कमी झाल्याने व्यावसायिकही अडचणीत आले आहेत.
----
साहित्य विक्रेते म्हणतात
लोखंडाचे भाव एवढे वाढले की, त्याचा नकारात्मक परिणाम व्यवसायावर झाला आहे. लोखंडाची भाववाढ पहिल्यांदा उच्चांकी पातळीवर पोहोचली आहे.
- मनिष मंत्री, वाशिम
बांधकाम साहित्यावर सरकारचे नियंत्रण नसल्याने सिमेंट, लोखंड उद्योगाची लॉबी एकत्र येऊन मनमानी भाववाढ करत आहे. यामुळे घरांच्या उभारणीवर परिणाम होत आहे.
- विरेंद्र बागरेचा, वाशिम
----
घर घेणे कठीणच
काेराेनामुळे आधीच आर्थिक टंचाई त्यात घर घेण्याचा विचार केला तर, घराचे भाव गगनाला भिडलेले. यामुळे सद्यस्थितीत घर घेणे कठीणच आहे.
- संताेष इंगळे, वाशिम
घराचे बांधकाम काढले अन सिमेंट, लोखंड, खडी, विटांचे भाव गगनाला भिडल्याने माझे बजेट कोसळले आहे. आता बांधकाम अर्धवट सोडले आहे.
- बाळू भाेयर, वाशिम
----