‘होम क्वारंटीन’ नागरिकांचा घराबाहेर वावर; धोका वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2020 05:02 PM2020-09-20T17:02:24+5:302020-09-20T17:02:42+5:30

नियम न पाळणाºया नागरिकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी शहरवासियांनी शनिवारी केलीे.

‘Home Quarantine’ of citizens outside the home; The risk increased | ‘होम क्वारंटीन’ नागरिकांचा घराबाहेर वावर; धोका वाढला

‘होम क्वारंटीन’ नागरिकांचा घराबाहेर वावर; धोका वाढला

Next

लोकमत न्युज नेटवर्क 
मालेगाव : होम क्वारंटीन, गृह विलगीकरण व थ्रोट स्वॅब नमुने घेतल्यानंतर घरातच राहण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, शहरातील अनेकजण घराबाहेर पडत असल्याने कोरोना विषाणू संसर्गाचा धोका वाढण्याची शक्यता बळावली आहे. नियम न पाळणाºया नागरिकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी शहरवासियांनी शनिवारी केलीे.
कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये म्हणून सर्दी, ताप, खोकला आदी लक्षणे असणाºया नागरिकांचीही टेस्ट  (तपासणी) केली जात आहे. या टेस्टचा  अहवाल येईपर्यंत या नागरिकांना होम क्वारंटीन म्हणून घरातच राहण्याचा सल्ला देण्यात येतो. अशा लोकांना कुठल्याही परिस्थितीत घरातील एका खोलीत स्वत : ला एकटे करून घ्यावयाचे आहे. कुटुंबातील इतर सदस्यांच्या संपर्कात यायचे नाही. मात्र अनेक नागरिक हे टेस्ट झाल्यानंतर शहरात बिनधास्त फिरत असल्याचे दिसून येते. अशा लोकांवर प्रशासन व पोलीस विभागाने कठोर कारवाई करणे गरजेचे आहे. होम क्वारंटीन असलेले नागरिक घराबाहेर फिरत असल्याचे पाहून मध्यंतरी खासगी डॉक्टरांनी ओपीडी   बंद केली होती. तसेच कोरोनाची सौम्य लक्षणे असलेली, टेस्ट पॉझिटिव्ह आली परंतू कोरोनाची लक्षणे नसलेल्या नागरिकांना गृह विलगीकरणाचा पर्याय उपलब्ध आहे. मालेगावातील काही नागरिक गृह विलगीकरणात असूनही, बरे वाटते म्हणून घराबाहेर पडत असल्याचे दिसून येते. संभाव्य धोका ओळखून नियम न पाळणाºया अशा नागरिकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी शहरवासियांनी केली.


शहरासह तालुक्यातील रुग्णसंख्येत वाढ
‘अनलॉक-४’च्या टप्प्यात मालेगाव शहरासह तालुक्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून येते. मालेगाव तालुक्यात ६० पेक्षा अधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्णसंख्या आहे. पॉझिटिव्ह लोकांच्या संपर्कात आलेल्यांचे ‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग’ व्यवस्थित होणेही गरजेचे आहे. अनेक लोक परस्पर टेस्ट करतात आणि खाजगी रुग्णालयात उपचार घेतात, याची माहिती प्रशासनाला वेळेवर मिळत नाही. त्यामुळे कोरोनाबाधितांचे ‘कॉन्टॅक्ट’ शोधण्यास अडचणी निर्माण होऊन पर्यायाने कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढतो. याबाबत नागरिकांसह प्रशासनही सतर्क असणे आवश्यक ठरत आहे.

Web Title: ‘Home Quarantine’ of citizens outside the home; The risk increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.