बनावट माहितीव्दारे विधवेला केले बेघर!

By admin | Published: March 31, 2017 07:38 PM2017-03-31T19:38:46+5:302017-03-31T19:38:46+5:30

मेडशी : ग्रामपंचायतच्या कागदपत्रात बनावट माहिती भरून विधवा महिलेस पाच अपत्यासह बेघर केल्याचा प्रकार मेडशी येथे उघडकीस आला आहे.

Homeless! | बनावट माहितीव्दारे विधवेला केले बेघर!

बनावट माहितीव्दारे विधवेला केले बेघर!

Next

मेडशी येथील प्रकार : न्यायासाठी पिडित महिलेचा टाहो

मेडशी : ग्रामपंचायतच्या कागदपत्रात बनावट माहिती भरून विधवा महिलेस पाच अपत्यासह बेघर केल्याचा प्रकार मेडशी येथे उघडकीस आला आहे. या प्रकरणी चौकशी करून न्याय देण्याची मागणी पिडित महिलेने गुरुवारी निवेदनाद्वारे केली आहे.
मालेगाव तालुक्यातील मेडशी येथे शे. युसूफ शे. अब्दुल हे त्यांच्या कुटुंबियांसह राहत होते. त्यांच्या आईने आपला नातू शे. युसुफ यांचा मुलगा शे. अकबरच्या नावे राहते घर केले होते. कालांतराने ते रोजगारासाठी परिवाराला घेऊन पुणे येथे गेले. तेथे युसुफ यांचे आजाराने निधन झाले. त्यानंतर काही दिवसांनी शे. युसूफ यांची पत्नी जानबी शे. युसूफ या मेडशी येथे त्यांना घरकूल मंजूर झाल्यामुळे गावी परतल्या. दरम्यान, घरकुलासाठी मालकीची जागा दाखविणे आवश्यक असल्याने त्यांनी ग्रामपंचायतकडे जागेचा ८ ह्यअह्ण मागितला. त्यावेळी त्यांच्या किंवा त्यांच्या मुलाच्या नावे जागाच नसल्याची धक्कादायक माहिती त्यांना मिळाली. याबाबत चौकशी केली असता ग्रामपंचायतच्या ठराव क्रमांक ६ दिनांक २९ आॅक्टोबर २०१० नुसार सदर जागा जानबी आणि शे. युसुफ यांचा मुलगा शे. अकबर याने त्याच्या पित्याच्या मोठ्या भावाच्या नावे केल्याचे ग्रामपंचायतच्या कागदपत्रावरून स्पष्ट झाले. प्रत्यक्षात शे. अकबर याचा जन्मच १२ एप्रिल २००० रोजी झाला. त्यामुळे केवळ सहा महिन्याचा असतानाच त्याने ग्रामपंचायतमध्ये जाऊन पित्याच्या मोठ्या भावाच्या नावे जागा केली तरी कशी, हा प्रश्न उपस्थित होत आहे.
-------------------
सदर प्रकरणाची तक्रार आजच आपल्याकडे प्राप्त झाली आहे. या संदर्भात चौकशी करण्यासाठी जुनी कागदपत्रे तपासणार असून, त्यानंतरच आपल्याला काही सांगता येईल.
- डी. एस. वाहोकार, ग्रामसचिव, मेडशी

Web Title: Homeless!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.