अनुदानाअभावी रखडली घरकुले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:43 AM2021-05-11T04:43:58+5:302021-05-11T04:43:58+5:30
00 भर जहाॅगीर येथे दोन कोरोना रुग्ण वाशिम : रिसोड तालुक्यातील भर जहॉगीर येथे आणखी दोन जणांना कोरोना संसर्ग ...
00
भर जहाॅगीर येथे दोन कोरोना रुग्ण
वाशिम : रिसोड तालुक्यातील भर जहॉगीर येथे आणखी दोन जणांना कोरोना संसर्ग झाल्याचे सोमवारी, (दि. १०) निष्पन्न झाले. भर परिसरात कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
०००००००
शैक्षणिक शुल्क माफ करण्याची मागणी
वाशिम : सन २०२०-२१ या वर्षात पहिली ते चौथीच्या शाळा सुरू झाल्या नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करण्यात यावे किंवा ५० टक्के सूट देण्यात यावी, अशी मागणी पालकांनी सोमवारी केली.
०००
निर्जंतुकीकरणासाठी निधीची प्रतीक्षा कायम
वाशिम : ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने निर्जंतुकीकरणासाठी फवारणी करणे गरजेचे आहे. जिल्हा परिषदेकडून ग्रामपंचायतींना उपाययोजनेसाठी पुरेसा निधी मिळाला नाही. त्यामुळे निर्जंतुकीकरण कसे करावे? हा प्रश्न निर्माण झाला.
000
कोरोनाबाबत गावात जनजागृती
वाशिम : चिखली, कवठा, व्याड, घोटा परिसरात कोरोना विषाणूचा संसर्ग अधिक प्रमाणात पसरू नये म्हणून आरोग्यवर्धिनी केंद्राच्यावतीने गत दोन दिवसांत गावात फिरून जनजागृती करण्यात आली. नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले.
00
शेतकरी चेतना केंद्राची मागणी
वाशिम : गावस्तरावर शेतकऱ्यांना प्रशिक्षण तसेच योग्य शेतीविषयक मार्गदर्शन मिळावे , सर्व सुविधा मिळाव्यात म्हणून शासनाकडून शेतकरी चेतना केंद्राची स्थापना केली जात आहे, असे केंद्र रिसोड तालुक्यातील चिखली येथेही व्हावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
०००
तालुका क्रीडा संकुलाचा प्रश्न रखडला
वाशिम : क्रीडाप्रेमी युवकांना मैदानी खेळांसाठी हक्काची जागा उपलब्ध व्हावी, यासाठी जिल्हा क्रीडा संकुलाप्रमाणेच तालुका क्रीडासंकुलही उभारले जावे, अशी मागणी वेळोवेळी करण्यात आली; मात्र हा प्रश्न अद्यापपर्यंत निकाली निघालेला नाही.
०००००००
अडोळी येथे आरोग्य तपासणी मोहीम
वाशिम : वाशिम तालुक्यातील अडोळी येथे सोमवारी १६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. आरोग्य विभागाने सतर्क होत नागरिकांची आरोग्य तपासणी मोहीम सुरू केली. सर्दी, ताप, खोकला, घसा दुखणे अशी लक्षणे असणाऱ्यांची चाचणी करावी, असे आवाहन करण्यात आले.
000
वाशिम शहरातील रस्त्याचे मजूबतीकरण (फोटो)
वाशिम : स्थानिक पाटणी चौक ते अकोना नाका यादरम्यान असलेल्या रस्ता दुरूस्तीचे काम सुरू असून, सुरुवातीला मजबुतीकरण आणि त्यानंतर डांबरीकरण केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात मजबुतीकरणाचे काम सुरू आहे.
00
संरक्षण भिंतीसाठी निधीची प्रतीक्षा
वाशिम : रिठद गावालगत पूरसंरक्षण भिंत उभारण्यासाठी शासनाकडून निधी मिळण्यासंदर्भात तालुका प्रशासनामार्फत सामाजिक कार्यकर्ते नारायण आरू यांनी वारंवार मागणी केली. अद्यापही निधी मिळाला नसल्याने निधी केव्हा मिळणार याकडे लक्ष लागून आहे.
000
लहान मुलांची काळजी घेण्याचे आवाहन
वाशिम : १० वर्षांआतील मुलांनादेखील कोरोना संसर्ग होण्याचा धोका असून, पालकांनी लहान मुलांना जपावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले. आपल्यापासून पाल्याला कोरोना संसर्ग होणार नाही, याची दक्षता पालकांनी घ्यावी, असा सल्लाही डॉक्टरांनी दिला.
00
शाळांमधील सुविधांकडे ग्रामपंचायतींचे दुर्लक्ष
वाशिम : १५ व्या वित्त आयोगातून विकासविषयक कामांसोबतच शिक्षण आणि आरोग्य या दोन प्रमुख घटकांवर एकूण खर्चाच्या २५ टक्के रक्कम खर्च करण्याची तरतूद आहे. मात्र, वाशिम तालुक्यात जिल्हा परिषद शाळांमध्ये सुविधा पुरविण्यासाठी निधी खर्च करण्याकडे ग्रामपंचायतींचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. त्यामुळे अनेक जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचे दिसून येते. ग्रामपंचायतींनी १५ व्या वित्त आयोगातून शाळांचे वीज देयक तसेच भौतिक सुविधा उपलब्ध कराव्यात, अशी मागणी होत आहे.
00