अनुदानाअभावी रखडली घरकुले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:27 AM2021-06-10T04:27:31+5:302021-06-10T04:27:31+5:30
शेतकरी चेतना केंद्र सुरू करण्याची मागणी वाशिम : गाव स्तरावर शेतकऱ्यांना प्रशिक्षण, तसेच योग्य शेतीविषयक मार्गदर्शन मिळावे, म्हणून ...
शेतकरी चेतना केंद्र सुरू करण्याची मागणी
वाशिम : गाव स्तरावर शेतकऱ्यांना प्रशिक्षण, तसेच योग्य शेतीविषयक मार्गदर्शन मिळावे, म्हणून शेतकरी चेतना केंद्राची स्थापना केली जात आहे, असे केंद्र रिसोड तालुक्यातील चिखली येथेही व्हावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
तालुका क्रीडा संकुलाचा प्रश्न रखडला
वाशिम : क्रीडाप्रेमी युवकांना मैदानी खेळांसाठी हक्काची जागा उपलब्ध व्हावी, यासाठी जिल्हा क्रीडा संकुलाप्रमाणेच तालुका क्रीडा संकुलही उभारले जावे, अशी मागणी वेळोवेळी करण्यात आली. मात्र, हा प्रश्न निकाली निघाला नाही.
हळद लागवडीबाबत मार्गदर्शन
वाशिम : फळबाग तज्ज्ञ निवृत्ती पाटील यांनी हळद लागवड व एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन या बाबीवर ऑनलाइन मार्गदर्शन केले. हळद पिकाकरिता जमिनीचा प्रकार, हळद बेणे प्रक्रिया, हळदीचे विविध वाण व गुणधर्म, रुंद सरी-वरंबा पद्धतीचा वापर आणि लागवडीच्या वेळेस द्यावयाची खतमात्रा या बाबीवर सविस्तर सादरीकरण करून शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन केले.