वाशिम येथे उद्या लोककलावंत सन्मान सोहळा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 02:48 PM2018-07-21T14:48:31+5:302018-07-21T14:50:35+5:30

वाशिम  : साहीत्यीक लोककलावंत तथा नाटयकाकार यांच्या विविध मागण्या संदर्भात १० जुलै १८ रोजी विदर्भ लोककला मंच नागपूरचा वतीने यशवंत स्टेडीअम ते नागपूर विधानभवनावर विराट असा महामोर्चा काढण्यात आलेला होता.

honor ceremony will be held tomorrow at Washim | वाशिम येथे उद्या लोककलावंत सन्मान सोहळा 

वाशिम येथे उद्या लोककलावंत सन्मान सोहळा 

googlenewsNext
ठळक मुद्दे स्थानिक विश्रामगृहावर मोर्चेकरी लोककलावंताच्या सन्मान सोहळयाचे आयोजन करण्यात आले आहे जोडगव्हाण येथील कलावंत मेळावा तथा १४ आॅगस्टच्या जिल्हाधिकारी कार्यालयावरील  महामोर्चाबद्दल  चर्चा करण्यात येईल.


लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम  : साहीत्यीक लोककलावंत तथा नाटयकाकार यांच्या विविध मागण्या संदर्भात १० जुलै १८ रोजी विदर्भ लोककला मंच नागपूरचा वतीने यशवंत स्टेडीअम ते नागपूर विधानभवनावर विराट असा महामोर्चा काढण्यात आलेला होता.  या यशस्वी विराट महामोर्चाचे सर्व श्रेय ग्रामीण भागातील तळागळातील प्रत्येक कलावंताचे आहे म्हणून वाशिम जिल्हा शाखेच्य वतीने २२ जुलै २०१८ रविवार रोजी सकाळी १०.०० वाजता स्थानिक विश्रामगृहावर मोर्चेकरी लोककलावंताच्या सन्मान सोहळयाचे आयोजन करण्यात आले आहे 
या कायक्रमाला प्रमुख् मार्गदर्शक म्हणून अमरावती प्रदेश विदर्भ लोककला मंचाचे प्रदेशाध्यक्ष , व्यसनमुक्ती प्रणेते संजय कडोळे राहणार असून नित्यानंद देशमुख महाराडा त्यांचे अध्यक्षतेखाली  तर प्रमुख अतिथी म्हणून दत्ताराव धांडे, संस्थापक अध्यक्ष संजय इंगळे जिल्हाध्यक्ष यांची उपस्थिती राहील. 
या कार्यक्रमात जोडगव्हाण येथील कलावंत मेळावा तथा १४ आॅगस्टच्या जिल्हाधिकारी कार्यालयावरील  महामोर्चाबद्दल  चर्चा करण्यात येईल. तरी या सन्मानसोहळयाला वाशिम जिल्हयातील साहीत्यीक लोककलावंतानी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष संजय इंगळे, उमेश अनासाने, देवेंड राउत, आशा उगाकर, विष्णुपंत खिल्लारे, देवकाबाई इंगोले, समाधान खरात यांनी केले.

Web Title: honor ceremony will be held tomorrow at Washim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :washimवाशिम