प्राण वाचविणा-या युवकाचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2017 08:02 PM2017-10-05T20:02:01+5:302017-10-05T20:02:40+5:30

मानोरा : सामुहीक गणेश विसर्जन करतांना वाटोद तलावात बुडत असणाºया मुलाचे प्राण वाचविणाºया युवकाचा मानोरा तहसीलदार यांच्याहस्ते प्रशस्तीपत्र देवुन सत्कार करण्यात आला.

The honor of the youth who saved the soul | प्राण वाचविणा-या युवकाचा सन्मान

प्राण वाचविणा-या युवकाचा सन्मान

googlenewsNext
ठळक मुद्देव्यंकटेश इश्वर भुतडा यास शौर्य पुरस्कार प्रदानगणेश विसर्जनादरम्यान व्यंकटेशाने वाचविले होते बुडणा-या युवकाचे प्राण

लोकमत न्यूज नेटवर्क
मानोरा : सामुहीक गणेश विसर्जन करतांना वाटोद तलावात बुडत असणाºया मुलाचे प्राण वाचविणाºया युवकाचा मानोरा तहसीलदार यांच्याहस्ते प्रशस्तीपत्र देवुन सत्कार करण्यात आला.
व्यंकटेश इश्वर भुतडा वर्ग ११ वीत शिकत असलेला युवक ५ सप्टेंबर रोजी सामुहिक गणेश विजर्सन करण्यासाठी गेला असता वाटोद तलावात बुडत असलेल्या अंकुश  भुनेरा शर्मा  हा १६ वर्षाचा मुलगा तलावात बुडत असल्याचे व्यंकटेशच्या लक्षात आले.त्याने विलंब न करता अंकुशचे प्राण वाचविले.यावेळी  व्यंकटेश इश्वर भुतडा यास शौर्य पुरस्कार देवुन प्रेस क्लब आणि  जिकरो ग्रुप आॅफ हेल्थ केअर च्यावतीने मानोराचे  तहसीलदार डॉ.सुनिल चव्हाण प्रशस्तीपत्र देवुन गौरविण्यात आले. यावेळी  डॉ.धनंजय राठोड, असलम पोपटे,  इश्वर भुतडा ,शाम लाहोटी,  राजेंद्र दिक्षीत उपस्थित होते. यावेळी तहसीलदार चव्हाण यांनी व्यंकटेश यांच्या नावाची  शिफारश शौर्य पुरस्कारासाठी संबंधीतांनाकडे करु असे सांगितले.

Web Title: The honor of the youth who saved the soul

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.