वाशिमच्या शिरपेचात मानाचा तुरा : बालगोपाल व्यायाम शाळेला ‘चंद्रपूर केसरी’चा सन्मान!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 07:19 PM2018-01-10T19:19:40+5:302018-01-10T19:24:09+5:30
वाशिम: चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या वतीने ५ ते ७ जानेवारीदरम्यान पार पडलेल्या महिला-पुरूष महापौर चषक कुस्ती स्पर्धेत वाशिमच्या बालगोपाल व्यायामशाळेच्या मल्लांनी सहभाग घेवून ‘चंद्रपूर केसरी’चा सन्मान प्राप्त केला. दरम्यान, या स्पर्धेत यशस्वी मल्लांचा १० जानेवारीला येथे एका कार्यक्रमात सत्कार करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क

स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील नामवंत मल्ल सहभागी झाले होते. त्यात वाशिमच्या बालगोपाल व्यायाम शाळेच्या अरूण खेंगळे या मल्लाने अंतीम लढतीमध्ये लातुरच्या मल्लास पराभुत करुन ‘चंद्रपूर केसरी’ हा मानाचा पुरस्कार पटकाविला. चांदीची गदा व रोख ५१ हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप होते. याच व्यायाम शाळेच्या श्रीराम वाडकर या मल्लाने ६५ किलो वजन गटामध्ये प्रथम क्रमांक मिळवून रोख दहा हजार रुपये व ट्रॉफी हा पुरस्कार पटकाविला. ५० किलो वजन गटात गणेश गोडघासे याने व्दितीय क्रमांक मिळवून पुरस्काराला गवसणी घातली.