आदर्श शेतकरी म्हणून सन्मानीत
By admin | Published: July 3, 2014 11:47 PM2014-07-03T23:47:17+5:302014-07-04T00:04:00+5:30
जि.प.पं.स.कृषी विभाग व आत्मा च्या वतीने १ जुलै हा दिवस हरित क्रांतीचे प्रणेते स्व.वसंतराव नाईक यांची जयंती कृषी दिन म्हणून साजरा करण्यात येतो
डोंगरे मंगरूळपीर : वर्षभरात अल्प शेत जमीनीत विविध प्रकारचे फळबागा फुलवून लाखोंचे उत्पादन घेणार्या ङ्म्रीक्षेत्र चिखली येथील ज्ञानेश्वर दत्तात्रय डोंगरे यांचा १ जुलै रोजी वाशिम जिल्हा परिषदेच्या वतीने स्व.वसंतराव नाईक यांच्या जयंती व कृषी दिनाचे औचित्य साधून आदर्श शेतकरी म्हणून जि.प.अध्यक्ष सोनाली जोगदंड यांच्या हस्ते शाल ङ्म्रीफळ तसेच साडी चोळी व सन्मानचिन्ह देवून सपेि४ह्यी२ँ२ँं१ें4ूस्रह्ण४२क सत्कार करण्यात आला. जि.प.पं.स.कृषी विभाग व आत्मा च्या वतीने १ जुलै हा दिवस हरित क्रांतीचे प्रणेते स्व.वसंतराव नाईक यांची जयंती कृषी दिन म्हणून साजरा करण्यात येतो या दिवशी जिल्हय़ातील ६ पं.स.मधून वर्षभरात चांगले आणि भरघोष उत्पादन घेणार्या तालुक्यातून एका शेतकर्यांचा आदर्श शेतकरी म्हणून सत्कार करण्यात येते. यावर्षी मंगरूळपीर तालुक्यातील ङ्म्रीक्षेत्र चिखली येथील ज्ञानेश्वर दत्तात्रय डोंगरे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आले. याप्रसंगी जि.प.उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, कृषी सभापती हेमेंद्र ठाकरे, समाज कल्याण सभापती पानुताई जाधव, महिला बाल कल्याण सभापती ज्योतीताई गणेशपुरे यांच्या सह कृषी विभागाचे अधिकारी व मान्यवरांचे उपस्थितीत होतकरू शेतकर्यांचा सन्मान सोहळा पार पडला. ज्ञानेश्वर डोंगरे यांच्याकडे १0 एकर शेती असुन त्यांनी सन २0१३-२0१४ या वर्षात विविध प्रकारचे प्रयोग करून प्रचंड उत्पन्न घेतले सुरूवातीला ४ एकरातील सोयाबीन पासुन ४0 क्किटलचे एक लाख ४0 हजार,दोन एकर शिमला मिरचीपासून ३00 क्किंटलचे ४ लाख,दोन एकर कपाशी पासून ४२ क्किंटलचे एक लाख ७0 हजार,४ एकर टरबुज लागवड करून अवघ्या काही दिवसातच ११0 क्किंटल पासुन ११ लाख,तर ४ एकर बिजोत्पादन कांदा लागवडी पासुन १२ क्किंटलाचे ३ लाख ६0 हजार असा एकुण वर्षभरात २१ लाख ७0 हजार रूपयाचे उत्पादन घेवुन तालुक्यात एक आदर्श निर्माण केले होते. त्यांच्या कार्याची दखल कृषी विभागाने घेवुन कृषीदिनी आदर्श शेतकरी दाम्पत्यांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देवुन सन्मानीत करण्यात आले.