आशा धडकल्या ‘टीएचओ’ कार्यालयात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:31 AM2021-06-04T04:31:20+5:302021-06-04T04:31:20+5:30
आरोग्य विभागातील शेवटचा घटक म्हणून जिल्ह्यात आशा, गटप्रवर्तक २००९ पासून काम करीत आहेत. मात्र, त्यांनी केलेल्या कामाचा योग्य ...
आरोग्य विभागातील शेवटचा घटक म्हणून जिल्ह्यात आशा, गटप्रवर्तक २००९ पासून काम करीत आहेत. मात्र, त्यांनी केलेल्या कामाचा योग्य मोबदला मिळत नसल्याने आशा व गटप्रवर्तकांमध्ये तीव्र असंतोष व्यक्त केला जात आहे. कोरोना महामारीचा गैरफायदा घेत या काळात आशा व गटप्रवर्तकांवर असंख्य कामे लादण्यात आलेली आहेत. जीव धोक्यात घालून ही सर्व कामे निमूटपणे करीत असताना आशांना पुरेशा संरक्षण सोयी-सुविधा उपलब्ध करून देणे तर सोडाच; परंतु योग्य मोबदलाही मिळत नसल्याचा आरोप आशा, गटप्रवर्तकांनी केला. याकडे शासन, प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ३ जून रोजी मालेगाव तालुक्यातील आशा, गटप्रवर्तकांनी तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय गाठून निवेदन सादर केले. १४ जूनपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास १५ जून रोजी एक दिवसीय लाक्षणिक संप तर १६ जूनपासून आशा गटप्रवर्तकांना नेमून दिलेल्या कामाव्यतिरिक्त इतर कोणतेही काम न करण्याचा पवित्रा आयटक संघटनेच्या वतीने घेण्यात आला.