आशा, गटप्रवर्तकांना थकीत मानधन मिळाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:38 AM2021-02-12T04:38:29+5:302021-02-12T04:38:29+5:30

वारला प्राथमिक आरोग्य केंद्र येथे गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविका म्हणून कार्यरत असताना, आरोग्यविषयक सर्व कर्तव्ये पार पाडली जात आहेत. ...

Hopefully, the group promoters got tired honorarium | आशा, गटप्रवर्तकांना थकीत मानधन मिळाले

आशा, गटप्रवर्तकांना थकीत मानधन मिळाले

Next

वारला प्राथमिक आरोग्य केंद्र येथे गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविका म्हणून कार्यरत असताना, आरोग्यविषयक सर्व कर्तव्ये पार पाडली जात आहेत. कुष्ठरूग्ण, क्षयरुग्ण शोधमोहीम असो, की माझे कुटुंब - माझी जबाबदारी मोहीम असो, या सर्व मोहिमेत आशा, गटप्रवर्तकांनी कर्तव्य बजावले आहे. कामाचा मोबदला नियमित मिळत नाही. तीन महिन्यांपासून मोबदला बँक खात्यात जमा करण्यात आला नाही. यासह विविध मागण्यांसंदर्भात आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तकांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश मोहिते यांच्या कक्षात धडक देत आपल्या व्यथा मांडल्या. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर यांच्याशीही आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तकांनी चर्चा केली. याची दखल घेत मोहिते व डॉ. आहेर यांनी संंबंधितांना सूचना देत तीन महिन्यांचे थकीत मानधन संबंधितांना देण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार १० फेब्रुवारी रोजी ५७ आशा स्वयंसेविका, दोन गटप्रवर्तक यांच्या बँक खात्यात थकीत मानधनाची रक्कम जमा करण्यात आली.

Web Title: Hopefully, the group promoters got tired honorarium

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.