गारपीटग्रस्तांच्या सर्वेक्षणात शेतकर्यांवर अन्याय
By admin | Published: July 1, 2014 10:09 PM2014-07-01T22:09:44+5:302014-07-02T00:35:05+5:30
मार्च महिन्यात झालेल्या गारपिट नुकसानीच्या सर्व्हेक्षणात शेतकर्यांवर अन्याय करण्यात आला
आसेगाव पो.स्टे. : नांदगाव येथे मार्च महिन्यात झालेल्या गारपिट नुकसानीच्या सर्व्हेक्षणात शेतकर्यांवर अन्याय करण्यात आला असून घरी बसल्या हे सव्है्रक्षण करण्यात आल्याचे निवेदन ग्रामस्थांनी तहसीलदार यांना दिले आहे. न्याय न मिळाल्यास उपोषणाचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
मार्च महिन्यात जिल्हयात गारपीट होऊन शेतकर्यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले होते. यामध्ये आसेगाव परिसरातील शेतकर्यांचाही मोठया प्रमाणात सहभाग आहे. या भागाचे सर्व्हेक्षण यादीमध्ये अनेक जणांना वगळल्याने शेतकरी संतप्त झाले. या संदर्भात नांदगाव येथील शेतकर्यांनी तहसीलदार अरखराव यांना निवेदन देवून न्यायाची मागणी केली आहे. शेतकर्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले की, नुकसान ग्रस्त भागाची पाहणी कोणत्याच अधिकार्यांनी न करता घरी बसल्या यादया तयार केल्याने यामध्ये पात्र लाभार्थ्यांना डावलण्यात आले तर ज्यांचे नुकसान झाले नाही त्यांना यादीत समाविष्ट करण्यात आले आहे. नादंगाव येथील ४0 शेतकर्यांचे नुकसान झाल्यानंतरही त्यांना वंचित ठेवल्याबद्दल दोषिंवर कारवाई करावी व शेतकर्यांना न्याय मिळवून दयावा अन्यथा उपोषण करण्याचा इशारा निवेदनाव्दारे देण्यात आला आहे. निवेदन देतेवेळी बबन ठाकरे, गजानन ठाकरे, रामदास ठाकरे, नामदेव सानप, कडुजी वर्हाडे, सिताराम सानप हजर होते.