घराला आग; गरीब कुटुंब उघड्यावर
By admin | Published: November 20, 2015 02:15 AM2015-11-20T02:15:32+5:302015-11-20T02:15:32+5:30
मंडळ अधिका-याने दिली सात हजारांची मदत; वाशिम जिल्ह्यातील धारकाटा येथील घटना.
वाशिम: तालुक्यातील धारकाटा येथील झोपडी आगीत खाक झाली. त्यामुळे शोभा उफाडे या महिलेचा संसार उघड्यावर आला असून, मंडळ अधिकार्याने या कुटुंबाला स्वत: सात हजारांची मदत दिली आहे. तालुक्यातील धारकाटा येथे एका झोपडीत शोभा रतन उफाडे या महिलेने आपल्या मुलांसह संसार थाटला आहे. या झोपडीला बुधवारी अचानक आग लागली. नागरिकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला; मात्र आगीत संपूर्ण घर खाक झाले. या घटनेची माहिती वाशिम तहसील कार्यालयाला मिळताच तहसीलदार आशीष बिजवल यांच्या मार्गदर्शनात मंडळ अधिकारी दीपक दंडे यांनी घटनास्थळ गाठले. पंचनामा केला असता, स्व त:च्या जागेत घर नसल्याने शासकीय नुकसानभरपाई मिळत नसल्याची बाब समोर आली. शासकीय नुकसानभरपाईची वाट न पाहता मंडळ अधिकारी दंडे यांनी स्वत:चे सहा हजार ९५0 रुपये उफाडे कुटुंबीयांना तत्काळ दिले. शासकीय कर्मचार्यातील माणूसपण जागृत झाल्याने उफाडे कुटुंबाला थोडाफार आर्थिक मद तीचा हात मिळाला आहे. स्वयंसेवी संघटनांच्या माध्यमातून या कुटुंबाचा उघड्यावरचा संसार पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे तहसील कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी संघटनेने लोकमतशी बोल ताना सांगितले. मंडळ अधिकारी दीपक दंडे यांनी यापूर्वीही सावरगाव व दोडकी येथील आगग्रस्त कुटुंबाना प्र त्येकी दहा हजारांची मदत देऊन माणूसपणाचा परिचय दिला होता.