वाशिम जिल्ह्यात बीएलओंकडून घरोघरी सर्वेक्षण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2020 04:06 PM2020-05-03T16:06:37+5:302020-05-03T16:06:53+5:30
बीएलओंमार्फत जिल्ह्यात घरोघरी सर्वेक्षणाचे काम सुरू करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : परजिल्ह्यातून वाशिम जिल्ह्यात दाखल होणारे मजूर, कामगारांसह अन्य नागरिकांची चौकशी करणे, आरोग्य तपासणी करून आवश्यकता भासल्यास ‘क्वॉरंटीन’ करण्यासाठी बीएलओंमार्फत जिल्ह्यात घरोघरी सर्वेक्षणाचे काम सुरू करण्यात आले आहे. यासंबंधी जिल्हा प्रशासनाने चार दिवसांपूर्वी सूचना दिल्या होत्या. त्याचे पालन केले जात असल्याचे दिसून येत आहे.
कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभुमीवर गेल्या काही दिवसांपासून परजिल्ह्यात मोलमजूरीच्या कामासाठी गेलेले मजूर, कामगार वाशिम जिल्ह्यातील ग्रामीण भागात आपापल्या गावी दाखल होत आहेत. त्याची माहिती घेऊन संबंधितांची आरोग्य तपासणी करण्यासह त्यांना आवश्यकता भासल्यास ‘क्वारंटिन’ करण्याकरिता ग्रामस्तरावर कोरोना प्रतिबंध समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. ही उपाययोजना यशस्वी झाली असून शहरी भागात परजिल्ह्यातून दाखल होणाºया नागरिकांची पुरेशी माहिती प्राप्त होण्यासाठी आता बीएलओमार्फत सर्वेक्षण केले जात आहे.