घरकुलांचा निधी अडकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:45 AM2021-08-24T04:45:35+5:302021-08-24T04:45:35+5:30

शिव मंदिर परिसरात शुकशुकाट वाशिम: कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर श्रावण महिन्यात शिव मंदिरात गर्दी न करण्याचे आवाहन प्रशासनाने शिवभक्तांना केले ...

Household funds stuck | घरकुलांचा निधी अडकला

घरकुलांचा निधी अडकला

Next

शिव मंदिर परिसरात शुकशुकाट

वाशिम: कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर श्रावण महिन्यात शिव मंदिरात गर्दी न करण्याचे आवाहन प्रशासनाने शिवभक्तांना केले असून, मंदिरातील कार्यक्रमांवर बंदी आहे. त्यामुळे श्रावणातील तिसऱ्या सोमवारीही जिल्हाभरातील मंदिरांमध्ये शुकशुकाट पाहायला मिळाला. अनेकांनी श्रावण सोमवारनिमित्त घरीच महादेवाला बेल पाने वाहिली.

-----------------

अपघाताच्या प्रकरणांची चौकशी थंड बस्त्यात

वाशिम: जिल्ह्यात गत वर्षभरात विविध मार्गावर अपघात घडून अनेकांचा मृत्यू झाला, तर काही गंभीर जखमीही झाले. यातील काही अपघाताच्या प्रकरणाची चौकशी अद्यापही पूर्ण झालेली नाही. पोलिसांनी गांभीर्याने चौकशी करून अपघातग्रस्तांच्या कुटुंबांना न्याय द्यावा, अशी मागणी केली जात आहे.

----------------------

रेशन दुकानात धान्य वितरणास विलंब

वाशिम: स्वस्त धान्य वितरण प्रणाली अंतर्गत पुरवठा केल्या जाणाऱ्या धान्याची उचल वेळेवर होऊनही लाभार्थींना वेळेत धान्य वितरण होत नसल्याचा प्रकार जिल्ह्यात काही ठिकाणी घडत आहे. त्यामुळे लाभार्थींची पंचाईत होत आहे. याची दखल जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी घेऊन संबंधित स्वस्त धान्य दुकानदारांना वेळेत धान्य वितरणाचे आदेश देण्याची मागणी होत आहे.

Web Title: Household funds stuck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.