पॉलिटेक्निक, फार्मसीचा अभ्यासक्रम पूर्ण कसा करणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:38 AM2021-02-14T04:38:36+5:302021-02-14T04:38:36+5:30

................. जिल्ह्यातील पॉलिटेक्निक कॉलेजची स्थिती पॉलिटेक्निक कॉलेज - ०१ प्रवेश घेतलेले विद्यार्थी - २६२ फार्मसी कॉलेज - ०५ प्रवेश ...

How to complete Polytechnic, Pharmacy course? | पॉलिटेक्निक, फार्मसीचा अभ्यासक्रम पूर्ण कसा करणार?

पॉलिटेक्निक, फार्मसीचा अभ्यासक्रम पूर्ण कसा करणार?

Next

.................

जिल्ह्यातील पॉलिटेक्निक कॉलेजची स्थिती

पॉलिटेक्निक कॉलेज - ०१

प्रवेश घेतलेले विद्यार्थी - २६२

फार्मसी कॉलेज - ०५

प्रवेश घेतलेले विद्यार्थी - ९५५

...............

काय म्हणतात विद्यार्थी

ऑनलाइन क्लासेस सुरू आहेत; पण त्यात विशेष असे काही कळत नाही. घरी अभ्यासदेखील पुरेसा होत नाही. अशात दोन महिन्यांनंतर परीक्षेला सामोरे कसे जाणार. परीक्षेसाठी आणखी वेळ मिळायला हवा.

- निखील शिखरे,

पॉलिटेक्निक विद्यार्थी

...........

परीक्षेसाठी खूप तयारी करावी लागते. ऑनलाइन क्लासेसचा विशेष असा फायदा झालेला नाही. ऑनलाइन स्वरूपात परीक्षा झाल्यास कठीण जाणार नाही; पण कॅम्पसमध्ये परीक्षा झाल्यास कठीणच जाणार आहे.

- लतेश जाधव

पॉलिटेक्निक विद्यार्थी

............

महाविद्यालय दोन महिन्यांत संपूर्ण अभ्यासक्रम कसा पूर्ण करणार आणि तो पूर्ण झाला नाही तर परीक्षा कशी देता येणार? याशिवाय अभ्यासाकरिता पुरेसा वेळदेखील मिळालेला नाही. परीक्षा ऑनलाइन झाल्यास सोयीचे होईल.

- गायत्री गणेशपुरे

फार्मसी विद्यार्थी

..............

गेल्या काही दिवसांपासून निश्चितपणे ऑनलाइन क्लासेस होत आहेत; पण ज्याप्रमाणे शाळेत शिकविले जाते आणि कळते, तसे ऑनलाइन क्लासमध्ये होत नाही. अभ्यासाकरिता पुरेसा वेळ मिळायला हवा, तेव्हाच परीक्षा व्हावी.

- पूनम अंभोरे

फार्मसी विद्यार्थी

...........

प्राचार्य काय म्हणतात...

परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले असले तरी दोन महिन्यांत परीक्षा घेणे अशक्य आहे. शासनाने यासंदर्भात आदेश दिले असले तरी विद्यापीठाने मात्र त्यास अद्याप मान्यता दिलेली नाही. विद्यार्थ्यांनाही अभ्यासाकरिता पुरेसा वेळ मिळणार नसल्याने परीक्षा दोन महिन्यांत होतील, असे वाटत नाही.

- डॉ. संजयकुमार तोष्णिवाल

प्राचार्य, विदर्भ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी कॉलेज, वाशिम

............

पॉलिटेक्निक कॉलेजने सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाइन क्लासेसच्या माध्यमातून शिक्षण दिलेले आहे. याशिवाय वेळोवेळी टेस्ट एक्झामही घेण्यात आली. शासनाच्या आदेशाचे पालन करून ऑनलाइन परीक्षा घेतली जाईल. वेळेवर निर्णय झाला तर कॉलेज कॅम्पसमध्ये येऊनही परीक्षा द्यावी लागेल.

- डॉ. विजय मानकर

प्राचार्य, पॉलिटेक्निक कॉलेज, वाशिम

Web Title: How to complete Polytechnic, Pharmacy course?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.