जगायचे कसे? घरगुती गॅस सिलिंडर पुन्हा २५ रुपयांनी महागले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:27 AM2021-07-04T04:27:31+5:302021-07-04T04:27:31+5:30

गेल्या आठ महिन्यांत घरगुती गॅस सिलिंडरच्या दरामध्ये २४० रुपयांपेक्षा अधिक वाढ झालेली आहे. सध्या एका सिलिंडरचा दर ८३४ रुपयांवर ...

How to live Domestic gas cylinders go up by Rs 25 again | जगायचे कसे? घरगुती गॅस सिलिंडर पुन्हा २५ रुपयांनी महागले

जगायचे कसे? घरगुती गॅस सिलिंडर पुन्हा २५ रुपयांनी महागले

Next

गेल्या आठ महिन्यांत घरगुती गॅस सिलिंडरच्या दरामध्ये २४० रुपयांपेक्षा अधिक वाढ झालेली आहे. सध्या एका सिलिंडरचा दर ८३४ रुपयांवर पोहोचला आहे. ज्या गोरगरीब कुटुंबांकडे गॅस नाही, त्यांना उज्ज्वला योजनेंतर्गत ते देण्यात आले. मात्र, सिलिंडरचे दर मोठ्या प्रमाणात वाढल्याने अनेकांनी स्वयंपाकासाठी पुन्हा चुलींचा पर्याय निवडल्याचे दिसत आहे.

..................

ऑगस्ट २०२० ते डिसेंबर २०२० मध्ये झालेली गॅस दरवाढ घरगुती आणि व्यावसायिक

ऑगस्ट - ६११/११६९

सप्टेंबर - ६११/११६९

ऑक्टोबर - ६१४/११९३

नोव्हेंबर - ६१४/१२३०

डिसेंबर - ७१४/१३३२

घरगुती/व्यावसायिक

.................................

जानेवारी २०२१ ते जुलैमध्ये झालेली दरवाढ

जानेवारी - ७१४/१४५०

फेब्रुवारी - ७१४/१५७२

मार्च - ७३९/१६७४

एप्रिल - ७९५/१७०३

मे - ७९५/१७०२

जून - ८०५/१७५०

जुलै - ८३४/१६१४

.................................

गावांत पुन्हा चुली पेटल्या

उज्ज्वला योजनेंतर्गत केंद्र शासनाने देशभरातील ज्या गोरगरीब कुटुंबांकडे स्वयंपाकाचा गॅस व सिलिंडर उपलब्ध नाही, अशा कुटुंबाला हे साहित्य उपलब्ध करून दिले.

योजनेची अपेक्षित फलश्रुती होऊन आज रोजी जवळपास ९० टक्के कुटुंबांकडे गॅस सिलिंडर उपलब्ध आहे.

दरम्यान, ज्यावेळी शासनाने उज्ज्वला योजना हाती घेतली, त्यावेळी स्वयंपाकाच्या सिलिंडरची किमत ५०० ते ६०० रुपयांच्या आसपास होती. आता मात्र सिलिंडरचा दर ८३४ रुपयांवर पोहोचला आहे. त्यातही गंभीर बाब म्हणजे गत वर्षभरापासून ग्राहकांना सिलिंडरवर मिळणारी सबसिडी तुटपुंज्या स्वरूपात असल्याने गावोगावी पुन्हा चुली पेटायला लागल्या आहेत.

.......................

घर खर्च भागवायचा कसा?

कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटामुळे मध्यंतरी उद्योगधंदे ठप्प झाले होते. त्यामुळे फारशी मिळकत झाली नाही. परिणामी, आर्थिक संकट कोसळले. दुसरीकडे गॅस सिलिंडरचे दरही वाढत असल्याने घर खर्च कसा भागवावा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

- लताबाई गोटे

.........................

मोठ्या प्रमाणात दर वाढल्याने उज्वला योजनेतून मिळालेले गॅस सिलिंडर भरून आणणे आता जमत नाही. त्यामुळे पूर्वीप्रमाणेच चुलीवर स्वयंपाकाचा पर्याय निवडला आहे. शासनाने वाढलेले दर कमी करावे, अशी अपेक्षा आहे.

...............

मार्च व एप्रिल महिन्यात उच्चांकी वाढ

घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने वाढ होत आहे. त्यातही मार्च आणि एप्रिल या दोन महिन्यांमध्ये उच्चांकी दरवाढ नोंदविल्या गेली. यामुळे सर्वसामान्य नागरिक जेरीस आले आहेत.

Web Title: How to live Domestic gas cylinders go up by Rs 25 again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.