स्वच्छ भारत अभियानाच्या लोगोची मानवी श्रृखला !
By Admin | Published: January 26, 2017 12:50 PM2017-01-26T12:50:00+5:302017-01-26T12:54:43+5:30
' गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड ' चे मिळाले प्रमाणपत्र नंदकिशोर नारे , ऑनलाइन लोकमत वाशिम, दि. २६ - ...
' गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड ' चे मिळाले प्रमाणपत्र
नंदकिशोर नारे , ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. २६ - 'ना गंदगी करेंगे ,ना करने देंगे ' असा मंत्र देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानास सुरु केले होते . या अभियानाच्या प्रारभनंतर स्वच्छतेसंदर्भात दोन विश्वविक्रम झालेत . या दोन्हीही विश्वविक्रम मोडून काढण्याच्या दृष्टीने वाशिम शहरात प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलीस कवायत मैदान वर जिल्हा प्रशासन व शहरातील विविध शाळांनी पुढाकार घेतला आहे आणि ७ हजार च्या वर विध्यार्थीनी एकत्र येवून स्वच्छ भारत अभियानाच्या लोगोची मानवी श्रुखला तयार करून गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड विश्वविक्रमासाठी नोंद केली . याबाबतचे प्रमाणपत्र कार्यक्रम स्थळी देण्यात आले आहे . १५ दिवसामध्ये या मानवी श्रृखेलचे पाहणी, परिक्षण केल्यानंतर गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड मध्ये नोंद केल्या जाईल .यावेळी पालकमंत्री संजय राठोड यांच्या उपस्थित गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड विश्वविक्रम दाखल प्रमाणपत्र दिले असल्याचं व आतापर्यंतची सर्वात जास्त मानव श्रृंखला लोगो वाशिमच्या विद्यार्थी यांनी केल्याचे दिल्लीवरून आलेले गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड चे अधिकारी आलोक कुमार यांनी सांगितले.
स्वच्छ भारत अभियानाच्या प्रारभानंतर यापूर्वी नार्वे देशात सन २०१४ मध्ये १ हजार २४३ मुलांनी एकत्र येवून स्वच्छतेच्या शपथेची पहिली नोंद 'गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड' मध्ये घेण्यात आली .२३ डिसेंबर २०१६ रोजी मध्य प्रदेशातील उज्जैन शहरात ५ हजार १५३ विद्यार्थ्यांनी मानवी साखळीद्वारे स्वच्छ अभियानाचा लोगो तयार करून स्वच्छतेची शपथ घेतली होती.या विक्रमामुळे नॉर्वे देशाच्या नावावर असलेला विश्वविक्रम मागे पडून उज्जैन शहराच्या नावावर नोंदविला गेला.तर आता वाशिम शहरात प्रजासत्ताक दिनी २६ जानेवारीला ७ हजारांवर विद्यार्थी एकत्र येवून महात्मा गांधी यांच्या चष्म्याची मानवी श्रुंखला तयार करून स्वच्छेतेची शपथ घेतली आहे.हा उपक्रम विश्व विक्रम म्हणून नोंदविला . यासाठी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी व नगर परिषद मुख्याधिकारी गणेश शेटे व चमू यांचे मोलाचे सहकार्य आहे .
https://www.dailymotion.com/video/x844pr7