शंभरावर ग्राहकांची वीज खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:39 AM2021-05-24T04:39:46+5:302021-05-24T04:39:46+5:30
००००० कारंजा शहरात आढळले १४ रुग्ण वाशिम : कारंजा शहरातील कोरोना रुग्णांच्या संख्येत चढ-उतार दिसून येतात. रविवारी आणखी १४ ...
०००००
कारंजा शहरात आढळले १४ रुग्ण
वाशिम : कारंजा शहरातील कोरोना रुग्णांच्या संख्येत चढ-उतार दिसून येतात. रविवारी आणखी १४ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. कोरोनाबाधितांच्या संपर्कातील नागरिकांची तपासणी केली जाणार असून, संदिग्धाचे स्वॅब घेतले जाणार आहेत.
००००
कर्जासाठी बँकेत सातबारा मिळेना!
वाशिम : पीक कर्ज काढण्यासाठी शेतकऱ्यांना राष्ट्रीयीकृत बँकेतच सातबारा देण्यात यावा, अशा स्पष्ट सूचना जमाबंदी आयुक्त विभागाने आठ महिन्यांपूर्वीच दिलेल्या आहेत. तथापि, बँकेत सातबारा उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांना गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे.
०००००
ऑनलाइन व्यवहार जपून करा!
वाशिम : ऑनलाइन व्यवहाराबाबत अनेक तक्रारी प्राप्त होत असल्याने, ऑनलाइन व्यवहार करताना सावधगिरी बाळगावी, असे आवाहन सायबर सेलतर्फे करण्यात आले आहे.
००००००
दलित वस्ती योजनेची कामे अपूर्ण
वाशिम : वारला, उकळीपेन, वारा जहांगीर आदी जिल्हा परिषद गटातील काही गावांमध्ये दलित वस्ती सुधार योजनेंतर्गतची कामे अपूर्ण आहेत, तर काही ठिकाणी या कामांची प्रतीक्षा आहे.
००००००
मक्याऐवजी ज्वारी देण्याची मागणी
वाशिम : स्वस्त धान्य दुकानांत देण्यात येत असलेल्या मक्याऐवजी ज्वारी किंवा गहू देण्याची मागणी लाभार्थ्यांच्या वतीने शुक्रवारी करण्यात आली. मक्यापासून लाभार्थ्यांना कोणताच फायदा होत नसल्याचे निवेदनात म्हटले आहे.
०००००
नगरतास कॅम्प येथे आरोग्य तपासणी
वाशिम : मालेगाव तालुक्यातील नगरतास कॅम्प येथे आणखी १९ जणांना कोरोना संसर्ग झाल्याचे रविवारी निष्पन्न झाले. खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे.