लोढाई माता यात्रेमध्ये शेकडो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2018 12:38 PM2018-10-19T12:38:23+5:302018-10-19T12:39:12+5:30

  रिसोड (वाशिम)  - तालुक्यातील मोरगव्हाणवाडीनजीक असलेल्या लोढाई माता मंदिर परिसरामध्ये नवरात्र उत्सवाच्या आठव्या माळीला यात्रा भरते. येथील यात्रेमध्ये शेकडो भाविकांनी सहभागी होत महाप्रसादाचा लाभ घेतला.

Hundreds of devotees took advantage of Mahaprashad in Yatra | लोढाई माता यात्रेमध्ये शेकडो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

लोढाई माता यात्रेमध्ये शेकडो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
  रिसोड (वाशिम)  - तालुक्यातील मोरगव्हाणवाडीनजीक असलेल्या लोढाई माता मंदिर परिसरामध्ये नवरात्र उत्सवाच्या आठव्या माळीला यात्रा भरते. येथील यात्रेमध्ये शेकडो भाविकांनी सहभागी होत महाप्रसादाचा लाभ घेतला.
लोढाई माता मंदिर परिसरामध्ये सकाळी ४ वाजतापासूनच भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. रिसोड तालुक्याबरोबरच लोणार, सेनगाव तालुक्यातून मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी आले होते. दुपारनंतर भाविकांना महाप्रसादाचे शिस्तबद्ध पद्धतीने वितरण करण्यात आले. भाविकांच्या सेवेसाठी लोढाई माता संस्थेचे अध्यक्ष भानुदास पाचरणे यांच्यातर्फे १५ क्विंटल पुरीचा महाप्रसाद, सुनील कायंदे मित्र मंडळ व सहानुभूती फ्रेंडस् क्लबच्यावतीने पाच क्विंटल तांदुळ व साबुदाना खिचडीचे वाटप करण्यात आले तर मोरगव्हाणवाडी येथील ग्रामस्थांच्यावतीने बुंदीचे लाडु, अशोक सोंगे यांच्याकडून पिण्याचे शूद्ध पाणी तर सचिन इप्पर युवा मंचद्वारे पाण्याचे टँकर पुरविण्यात आले. आसोला येथील अशोक आघाव व ग्रामस्थांच्या वतीने शिरापुरीच्या प्रसादाचे वितरण करण्यात आले. येथील विकास कामांसाठी भक्तांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात मदत मिळत आहे. यात्रेदरम्यान रिसोडचे सहायक पोलीस निरीक्षक हरिभाउ कुलवंत यांच्या नेतृत्वात बिट जमादार कातडे, सांगळे, मुसळे व सहकाºयांनी चोख बंदोबस्त ठेवला.

 गर्दिचा आमदारांसह मान्यवरांना फटका
लोढाई माता संस्थानवर दर्शनासाठी लोकप्रतिनिधी, पदाधिकाºयांसह सर्वसामान्य भाविक मोठ्या संख्येने हजेरी लावतात. दर्शनासाठी आमदार अमित झनक दुपारी १.३० वाजता जात असताना गर्दीमुळे मोरगव्हाण ते लोढाई माता मंदिरादरम्यान अवघ्या दोन किलो मिटरच्या प्रवासाला दोन तास लागले. येथील देवस्थानाकडे जाण्यासाठी मोरगव्हाणवरून पांदण रस्त्याने शेकडो कार्यकर्ते, भाविकांनी भेटी दिल्या.

Web Title: Hundreds of devotees took advantage of Mahaprashad in Yatra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.