शेकडो ग्रामस्थ जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले!
By admin | Published: August 25, 2015 02:30 AM2015-08-25T02:30:33+5:302015-08-25T02:30:33+5:30
पादंन रस्ता सुरु करण्याच्या मागणीसाठी पिंपळशेंडा येथील ग्रामस्थांचं आंदोलन.
वाशिम : पादंन रस्ता सुरु करण्याच्या मागणीसाठी २४ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर पिंपळशेंडा येथील शेकडो ग्रामस्थांनी धडक देवून जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात पिंपळशेंडा येथील ग्रामस्थांनी म्हटले की, आमच्या गावाला येण्याचा वडिलोपार्जित एकच रस्ता असून तो नियमानुसार तहसीलदार यांनी मोजमाप करुन लोकवर्गणीतून काम चालु केले व अधिकारी तेथून निघून गेले. पण काही जणांनी त्यावर स्थगिती पत्र आणून काम बंद पाडले. यामुळे गावातील जनजिवन विस्कळीत झाले असून शाळकरी मुलांचे नुकसान होत असल्याचे म्हटले आहे. तरी याबाबीचा आपण विचार करुन गावचा पांधन रस्ता चालु करण्याची मागणी निवेदनातून केली आहे. निवेदनावर शेकडो ग्रामस्थांच्या स्वाक्षर्या आहेत.