आश्वासनानंतर उपोषणाची सांगता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 04:40 PM2019-05-16T16:40:48+5:302019-05-16T16:41:28+5:30
नायब तहसीलदार व उपमुख्याधिकारी यांच्या हस्ते लेखी आश्वासनानंतर उपोषणाची सांगता करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा : शहरातील कांगारपुरा येथील सार्वजनिक शौचालय , मुत्रीघर व नाल्याची साफसफाईबाबत चौकशी करावी तसेच त्याची स्वच्छता राखली जात नाही त्यामुळे परिसरातींल नागरिकांना दुगंर्धीचा सामना करावा लागतो. या कामाची चौकशी करून कार्यवाही करावी या मागणी साठी छगन वाघमारे यांनी शौचालयाच्या स्लॅबवर १३ मे पासून आमरण उपोषणास सुरू होते. अखेर नायब तहसीलदार व उपमुख्याधिकारी यांच्या हस्ते लेखी आश्वासनानंतर उपोषणाची सांगता करण्यात आली.
शहरातील स्वच्छतागृह, मुत्रीघर, नाल्यांची सफाई केल्या जात नसल्याने सर्वत्र दुर्गंधीचा सामना करण्याची वेळ शहरवासियांवर आली होती. त्यात कांगरपुरा येथील नाल्या तुंडूंब भरुन वाहूनही स्वच्छता करण्यात येत नसल्याने वाघमारे यांनी १३ मे रोजी शौचालय ईमारतीच्या स्लॅबवर उपोषणास सुरवात केली. उपोषण सुरू होते त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येत असल्याने त्यांना उपोषनाच्या दुसº्या दिवशी सायंकाळी छगन वाघमारे यांना ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले. अखेर नगर परिषद उपमुख्याधिकारी स्वप्निल खामकर , नायब तहसीलदार हरणे, शहर पोलीस पाटील गोपाल पाटिल भोयर, दिलीप राऊळ यांच्या उपस्थित लेखी आश्वासन देऊन ग्रामीण रुग्णालयात उपोषण सोडवण्यात आले.