महावितरणमधील कंत्राटी कामगारांचे अन्नत्याग आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:31 AM2021-06-04T04:31:26+5:302021-06-04T04:31:26+5:30
महाराष्ट्रातील कंत्राटी कामगार व शिकाऊ उमेदवार सध्या हवालदिल झाले आहेत. कंपनीमध्ये कार्यरत कंत्राटी कामगारांचा कोविड १९ कालावधीतील सेवाकाळ पाहता ...
महाराष्ट्रातील कंत्राटी कामगार व शिकाऊ उमेदवार सध्या हवालदिल झाले आहेत. कंपनीमध्ये कार्यरत कंत्राटी कामगारांचा कोविड १९ कालावधीतील सेवाकाळ पाहता त्यांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घ्यावे, त्यासाठी विशेष भरती मोहीम राबविण्यात यावी, कंत्राटी कामगारांना सरळ सेवेत भरतीमध्ये प्राधान्य देऊन सामावून घ्यावे, रोजंदारी पद्धतीने कामावर घेऊन शाश्वत रोजंदारीची हमी द्यावी, सरळ सेवा भरतीकरिता वयोमर्यादेत वाढ करावी. राज्य शासनाने अत्यावश्यक सेवेतील रिक्त पदे भरण्याकरिता गतीने सरळ सेवा भरती मोहीम राबविणे सुरू केले आहे. त्या धर्तीवर तिन्ही कंपन्यांतील तृतीय व चतुर्थ श्रेणीतील रिक्त जाआंचा अनुशेष त्वरित दूर करावा, यासह इतरही मागण्यांची पूर्तता करावी, अशी मागणी मुख्यमंत्री व ऊर्जा मंत्री यांच्याकडे केली होती. मात्र, त्याची दखल न घेतल्याने अखेर कंत्राटी कामगारांनी ३ जून रोजी काळी फित लावून कामकाज करण्यासह अन्नत्याग आंदोलन केले.
या आंदोलनात तांत्रिक ॲप्रेंटिस, कंत्राटी कामगार असोसिएशनचे नितीन चव्हाण, प्रदीप पाटील, प्रशांत नन्नरे, शेख राहील, अतुल पाटील थेर, किरण कराळे, प्रकाश वाघ, गजानन आगम, रोशन देशमुख, किरण राऊत, कल्पक वाईकर, मेहराज मिर्झा, शाम भारती, गजानन खंडारे, हरीश इंगोले, विकी कावळे, गणेश राणे, इरफान शेख, ज्ञानेश्वर मापारी, ऋषिकेश वसू, कुणाल कुसरे, मनीष धारम, अमोल पाटील, अर्जुन मुळे, अमोल इंगोले, केशव वाकुडकर, गोपाल इंगोले, धीरज साबळे, चंदू कागलकर, उद्धव गजभार, दत्ता हलगे, विष्णू खडसे, गजानन खंदारे, सदाशिव भुसारे, किरण चतुर्भुज आदींसह इतर कंत्राटी कामगारांनी सहभाग नोंदविला.