बायकोकडून करण्यात आला पतीदेवाचा छळ; कोरोना काळात पुरुषांनीही केल्या तक्रारी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:25 AM2021-07-23T04:25:07+5:302021-07-23T04:25:07+5:30

काेराेना संसर्ग २०१९ मध्ये नसताना केवळ एका पुरुषाची आपल्या पत्नीविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आलेली आहे, तर काेराेना काळ २०२० ...

Husband was persecuted by his wife; Complaints made by men during the Corona period! | बायकोकडून करण्यात आला पतीदेवाचा छळ; कोरोना काळात पुरुषांनीही केल्या तक्रारी!

बायकोकडून करण्यात आला पतीदेवाचा छळ; कोरोना काळात पुरुषांनीही केल्या तक्रारी!

googlenewsNext

काेराेना संसर्ग २०१९ मध्ये नसताना केवळ एका पुरुषाची आपल्या पत्नीविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आलेली आहे, तर काेराेना काळ २०२० व २१ मध्ये एकूण ८ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यामध्ये २०२० मध्ये ०६ तर २०२१ मध्ये २ तक्रारीचा समावेश आहे. विशेष म्हणजे दाखल करण्यात आलेल्या तक्रारीही क्षुल्लक कारणावरून आहेत.

क्षुल्लक कारणावरून वाद विवाद

दिवसभर माेबाईलवर काय करता, शहर बंद आहे, तर घरातील कामधंद्यामध्ये हातभार लावण्याचे कारण

घरी बसल्या बसल्या ताेंडाचे चाेचले पुरविण्याचा ठेका घेतला नाही यावरून वाद

माेबाईलवर काेणाशी चॅटिंग करता असा संशय घेऊन वादाचे रूपांतर तक्रारीत

.......

कोरोना काळात तक्रारी वाढल्या

काेराेना काळापूर्वी बायकाेकडून हाेत असलेल्या छळाच्या तक्रारी पाहता काेराेना काळात पुरुषांच्या तक्रारीत वाढ झाल्याचे पाेलीस विभागात असलेल्या नाेंदीवरून दिसून येते. २०१६ ते २०१८ या तीन वर्षात केवळ ६ तक्रारी आहेत. तर २०२० व २१ या दाेन वर्षात एकूण ८ तक्रारी आहेत.

.....

आर्थिक टंचाई आणि अति सहवास

काेराेनामुळे हातचे कामधंदे गेलेत, घरी बसून बसून कंटाळवाणे झाल्याने आपसूकच माणसात चिडचिडेपणा येणे. आर्थिक चणचणीमुळे वाद.

दिवसभर कामानिमित्त बाहेर राहत असताना अचानक सहवास वाढल्याने घरात कलह वाढताे असे मानसाेपचार तज्ज्ञ इंगळे यांनी सांगितले.

.....

पुरुषांच्या हक्कासाठी कोण लढणार?

पुरुषांच्या हक्कासाठी काेणीही लढताना दिसून येत नाही. महिला अत्याचार असाे वा पुरुष दाेघेही समान आहेत. अत्याचार हाेऊ नये याकरिताच सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे भारतीय परिषद बचाव संघटनेचे विदर्भप्रमुख जय आकाेलकर यांनी सांगितले.

Web Title: Husband was persecuted by his wife; Complaints made by men during the Corona period!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.