वाशिम जिल्ह्यात एच.व्ही.डी.एस. रोहित्र मोहीम फसली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2019 03:54 PM2019-01-02T15:54:44+5:302019-01-02T15:55:02+5:30
मोहीम वाशिम जिल्ह्यात फसली असुन, यामुळे विज जोडण्या लवकर मिळण्याऐवजी दोन वर्ष विलंबाने मिळणार असल्याने हजारो एकरावरील सिंचन प्रभावीत होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : विज चोरील२ा आळा बसण्यासाठी तथा शेतकºयाला सिचंनासाठी विज जोडण्या त्वरित मिळण्यासाठी विज वितरण कंपनी (एच.व्ही.डी.एस) या छोटय विज रोहीत्र लावण्याची मोहीम हाती घेतली आहे, परंतु ही मोहीम वाशिम जिल्ह्यात फसली असुन, यामुळे विज जोडण्या लवकर मिळण्याऐवजी दोन वर्ष विलंबाने मिळणार असल्याने हजारो एकरावरील सिंचन प्रभावीत होणार आहे.
विज वितरण कंपनी वाशिमने पुर्वी लावत असलेले ६३, १००, २०० चे विज रोहीत्र लावणे पूर्ण बंद केले असुन नव्या पध्दतीचे एच.व्ही.डी.एस.रोहीत्र लावण्याची मोहीम हाती घेतली. तशा प्रकारचे आॅनलाईन सर्वेक्षण करण्यात आले, परंतु विज वितरण कंपनी वाशिमने ५ हजार एच.व्ही.डी.एस छोट्या विज रोहीत्राची मागणी वरिष्ठाकडे दोन -तीन महिन्यापुर्वी केली. या मागणीनुसार केवळ १० छोटे रोहीत्राचा पुरवठा केल्या जाणार असल्याने जिल्हानिहाय थोडे थोडे रोहीत्र पुरविले जाणार असल्याची माहिती सुत्रांकडून प्राप्त झाली आहे. जर वाशिम जिल्ह्यातील वाढते सिचंन प्रभावित करायचे नसतील तर विज वितरण कंपनीने जोपर्यंत नव्याने येणारे छोटे रोहीत्र उपलब्ध होत नाही. तोपर्यंत ६३,१००, २०० चे विज रोहीत्र लावुन विज जोडण्यात द्याव्यात अशी मागणी शेतकºयाकडून होत आहे.
आम्ही ५ हजार छोटे विज रोहीत्राची मागणी केली आहे. त्यापैकी १० रोहीत्र कारंजा तालुक्यात लावले असुन, अजून ९ रोहीत्र उपलब्ध झाले आहे. यापुढे उपलब्ध होणारे रोहीत्र सिंचन प्रकल्पावर लावण्यास प्राधान्य देवु परंतु मागणी पूर्ण होण्यास कालावधी लागणार आहे.
- विनोद बेथारिया,अधिक्षक अभियंता, विज वितरण कंपनी मर्या.वाशिम