गावकऱ्यांना स्वच्छतेबाबत मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:25 AM2021-07-03T04:25:32+5:302021-07-03T04:25:32+5:30
----------- आरोग्य केंद्राकडून ग्रामस्थांना मार्गदर्शन वाशिम : आरोग्य पोषण व समुपदेशन कार्यक्रमांतर्गत पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या वतीने ...
-----------
आरोग्य केंद्राकडून ग्रामस्थांना मार्गदर्शन
वाशिम : आरोग्य पोषण व समुपदेशन कार्यक्रमांतर्गत पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या वतीने ग्रामस्थांना आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात येत आहे. गेल्या आठवडाभरापासून हा उपक्रम सुरू असून, कोरोना संसर्गावर नियंत्रणासाठी या उपक्रमाला वेग देण्यात आला आहे.
----------
एटीएम मशीनची दुरवस्था
वाशिम : जिल्ह्यातील विविध बँकांचे काही एटीएम अनेक दिवसांपासून बंद आहेत. त्यात मंगरुळपीर येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेलगतच असलेल्या एटीएम मशीनची दुरवस्था झाल्याचे गुरुवारी दिसून आले.
---------------
खंडाळ्यात ९५ टक्के पेरण्या
वाशिम : तालुक्यात दमदार पावसामुळे खरीप पेरणीला वेग आला आहे. त्यात खंडाळा परिसरात ९५ टक्के पेरण्या आटोपल्या असून, इतरही शेतकरी पेरण्या उरकत असल्याचे चित्र गुरुवारी दिसले.
---------------
महामार्गाच्या नवनिर्मित पुलावर डबके
वाशिम : राष्ट्रीय महामार्गावर मंगरुळपीर तालुक्यातील शेलूबाजार ते चिखलीदरम्यान लांभाडे यांच्या शेताजवळच्या पुलावर पावसाच्या पाण्याचे डबके साचले आहे. त्यामुळे चालकांना अशी कसरत करावी लागत आहे.
^^^^^
बँक खात्याअभावी शिष्यवृत्ती मिळेना !
वाशिम : विविध योजनांत पात्र विद्यार्थ्यांना समाजकल्याण विभागातर्फे शिष्यवृत्ती दिली जाते. तथापि, अचूक बँक खाते क्रमांक नसल्याने शिष्यवृत्ती रखडली. अचूक बँक खाते क्रमांक पाठविण्याचे आवाहन समाजकल्याण अधिका-यांनी गुरुवारी केले.