‘स्वच्छता हिच सेवा’ अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2017 07:41 PM2017-09-17T19:41:52+5:302017-09-17T19:43:25+5:30
रिसोड - रिसोड तालुक्यातील मांगुळझनक ग्रामपंचायत येथे रविवारी ‘स्वच्छता हिच सेवा’ अभियान राबविण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
रिसोड - रिसोड तालुक्यातील मांगुळझनक ग्रामपंचायत येथे रविवारी ‘स्वच्छता हिच सेवा’ अभियान राबविण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपसरपंच बेबीताई महादेव ठाकरे होते. मान्यवरांनी संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन केले. ज्येष्ठ शेतकरी दगडूजी घोटे, पंचायत समिती उपसभापती महादेवराव ठाकरे, ग्रा.पं. सदस्य संतोष भुतडा, भागवत चव्हाण, अभिमन्यू घोटे, नर्मदाबाई झनक, ओमप्रकाश नवघरे, शालेय शिक्षण समिती अध्यक्ष संजय झनक, श्रीराम चव्हाण, विनायक काळे, सेवा सहकारी संस्था संचालक दत्तराव ठाकरे, राजू जामकर, मानिकराव राईतकर, सुभाष रनशिंगे, शेख अलिम, गजानन इंगळे, ग्रामसचिव एस.एम. काळे, कृषिसहायक वाय.जी.तोटावार, ग्रा.पं. कर्मचारी केशवराव कोरडे, दिपक झनक, अरुण घोटे यांच्यासह गावकरी मोठया संख्येने स्वच्छता अभियानामध्ये सहभागी झाले होते. हातामध्ये खराटे घेवून ग्रामपंचायतपासून प्रत्यक्ष साफसफाई करण्यात आली. १७ सप्टेंबर हा दिवस स्वच्छता दिन म्हणून साजरा करण्यात आला. सकाळी १० ते दूपारी १२ वाजेपर्यंत श्रमदान करण्यात आले. शौचालय उभारणीसाठी व परिसर स्वच्छतेबाबत २ आॅक्टोबरपर्यंत विविध कार्यक्रम ग्रामपंचातच्यावतीने राबविण्यात येणार आहेत.