शासकीय कामासाठी पैशांची मागणी झाल्यास करा सीईओंच्या मोबाईलवर तक्रार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2021 05:35 PM2021-03-03T17:35:29+5:302021-03-03T17:36:32+5:30
Washim ZP News थेट जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाºयांच्या (सीईओ) व्हॉट्स अॅप क्रमांकावर तक्रार नोंदविता येणार आहे.
वाशिम : जिल्हा परिषद, पंचायत समितीशी संबंधित कोणत्याही शासकीय कामासाठी कुणी पैशाची मागणी करीत असेल तर आता थेट जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाºयांच्या (सीईओ) व्हॉट्स अॅप क्रमांकावर तक्रार नोंदविता येणार आहे. यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी कक्षासमोर ठळक अक्षरात सूचनाफलकही लावला आहे.
ग्रामीण भागाचे मिनी मंत्रालय म्हणून जिल्हा परिषदेकडे पाहिले जाते. जिल्हा परिषद, पंचायत समितीशी संबंधित एखादे काम करून देण्याच्या नावाखाली एखाद्या अधिकारी किंवा कर्मचाºयांकडून संबंधितांकडे पैशाची मागणी होऊ शकते. पैशाची मागणी पूर्ण न झाल्यास नियमात बसणारे शासकीय काम करण्यास टाळाटाळ होते. हा प्रकार टाळण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश मोहिते यांनी आपल्या कक्षासमोर एक सूचनाफलक लावला आहे. जिल्हा परिषद वाशिम अंतर्गत शासकीय कामाकरीता जिल्हा परिषदेचे अधिकारी अथवा कर्मचारी स्वत: किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नावाने पैशाची मागणी करीत असल्यास मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या ८६९१०२१११८ या व्हॉटस् अप क्रमांकावर संदेश करावा, असा या सूचना फलकावरील आशय आहे. वाशिम जिल्हा परिषदेची स्थापना झाल्यापासून आतापर्यंत एकाही मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी कक्षासमोर असा फलक लावला नाही, हे विशेष. शासकीय कामाकरीता कुणी अधिकारी, कर्मचारी पैशाची मागणी करीत असेल तर मुख्य कार्यकारी अधिकाºयांच्या व्हॉटस् अप क्रमांकावर पुराव्यानिशी तक्रार नोंदविता येणार आहे.
नियमात बसणारे कोणतेही शासकीय काम हे विनाविलंब, पारदर्शक पद्धतीने होणे आवश्यक आहे. कोणत्याही शासकीय कामाकरीता कोणत्याही अधिकारी, कर्मचाºयांना पैसे देऊ नये. पैशाची मागणी कुणी करीत असेल तर थेट व्हॉटस्अप क्रमांकावर मेसेज करावा. या मेसेजची शहानिशा केल्यानंतर संबंधित अधिकारी, कर्मचाºयाविरूद्ध निश्चितच कारवाई केली जाणार आहे.
- मंगेश मोहिते, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद वाशिम