सरपंचांना क्षमता बांधणी प्रशिक्षण योग्यवेळी दिल्यास गाव झपाट्याने समृद्ध होईल.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:42 AM2021-04-01T04:42:50+5:302021-04-01T04:42:50+5:30
मानोरा : गावहिताच्या दृष्टिकोनातून आदर्श गाव ही संकल्पना अस्तित्वात आणण्यासाठी गावच्या सरपंचांना क्षमता बांधणी प्रक्षिक्षण योग्यवेळी दिल्यास गाव ...
मानोरा : गावहिताच्या दृष्टिकोनातून आदर्श गाव ही संकल्पना अस्तित्वात आणण्यासाठी गावच्या सरपंचांना क्षमता बांधणी प्रक्षिक्षण योग्यवेळी दिल्यास गाव झपाट्याने समृद्ध होईल, असे प्रतिपादन जलदूत रवींद्र इंगोले यांनी तालुक्यातील कारखेडा ग्रामपंचायतीकडून आयोजित कार्यक्रमात बुधवारी (३१ मार्च) केले.
कारखेडाच्या नवनिर्वाचित सरपंच सोनाली बबन सोळंके यांनी महाराष्ट्रभर जलसाक्षरता आणि ‘पंचायत राज’चे नवनिर्वाचित सरपंचांचे प्रवीण प्रशिक्षण रवींद्र इंगोले (यशदा, पुणे) यांच्या ग्रामपंचायत प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या प्रशिक्षणामध्ये नेतृत्व आणि विकासाची दृष्टी, सरपंचपदाचे कार्य, अधिकार व जबाबदारी याविषयी माहिती देण्यात आली. यावेळी जलदूत रवींद्र इंगोले यांनी गाव विकासासाठी प्रोत्साहन मिळावे यासाठी पंचायत राज पुस्तक, पाण्याचा ताळेबंद आणि वृक्ष भेट देत सरपंच सोनाली सोळंके यांचा सत्कार केला.
या कार्यक्रमाला उपसरपंच अनिल सीताराम काजळे, ग्रामपंचायत सदस्य चैताली विवेक परांडे, जलदूत माधुरी कांबळे, पुष्पा चव्हाण, नंदा काजळे, अरूणा जाधव, कमला राठोड, किशोर देशमुख, राजू राऊत, शैलेश देशमुख उपस्थित होते. या अभिनव कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल कारखेड़ा ग्रामपंचायतीचे कौतुक केले जात आहे.