वाशिममध्ये लाभार्थींचा अर्ज नामंजूर झाल्यास विभाग प्रमुख जबाबदारी!
By संतोष वानखडे | Published: April 20, 2023 04:08 PM2023-04-20T16:08:25+5:302023-04-20T16:09:45+5:30
वाशिम : शासकीय योजनांची जत्रा या उपक्रमांतर्गत लाभार्थींकडून शासकीय योजनेच्या लाभासाठी आवश्यक त्या कागदपत्रांसह परिपूर्ण अर्ज भरून घ्यावा. कोणत्याही ...
वाशिम : शासकीय योजनांची जत्रा या उपक्रमांतर्गत लाभार्थींकडून शासकीय योजनेच्या लाभासाठी आवश्यक त्या कागदपत्रांसह परिपूर्ण अर्ज भरून घ्यावा. कोणत्याही गरजू लाभार्थ्याचा अर्ज नामंजूर केला जाणार नाही, याची जबाबदारी संबंधित विभागाची असून, त्याअनुषंगाने सर्वांनी नियोजन करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सुनील निकम यांनी दिल्या.
जिल्हा परिषदेच्या सर्व विभागाच्या योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी सुनील निकम यांनी विभाग प्रमुखांकडून आढावा घेतला.
मुख्य लेखा व वित्त अधिकारी दिनकर जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी यशवंत सपकाळे, दिगंबर लोखंडे, संजय जोल्हे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुहास कोरे, शिक्षणाधिकारी राजेंद्र शिंदे, लघुसिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता लक्ष्मण मापारी, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अजिंक्य वानखडे, समाजकल्याण अधिकारी मारोती वाठ, मनरेगा गट विकास अधिकारी रविंद्र सोनोने, उपशिक्षणाधिकारी गजानन डाबेराव, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता व्ही.डी. पाटील आदी उपस्थित होते. शासकीय योजनांची जत्रा या उपक्रमांतर्गत ग्रामिण भागातील शेवटच्या घटकापर्यंत योजनांचा लाभ कसा पोहचेल, याचे नियोजन विभाग प्रमुखांनी करावे असे निर्देश निकम यांनी दिले. योजनांचा लाभ देण्यासाठी दिलेले उद्दिष्ट प्रत्येक विभागाने पूर्ण करावे, अशा सूचनाही प्रभारी सीईओंनी दिल्या.