आधारकार्ड नसेल तर शिष्यवृत्तीही नाही!

By Admin | Published: August 29, 2016 12:02 AM2016-08-29T00:02:39+5:302016-08-29T00:02:39+5:30

एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाचा फतवा : ‘ऑनलाइन’द्वारे मिळणार लाभ.

If there is no Aadhar card then there is no scholarship! | आधारकार्ड नसेल तर शिष्यवृत्तीही नाही!

आधारकार्ड नसेल तर शिष्यवृत्तीही नाही!

googlenewsNext

वाशिम, दि. २८: अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक, महाविद्यालयीन शिक्षणादरम्यानच्या शिष्यवृत्तीचा लाभ ऑनलाइन प्रणालीद्वारे मिळणार असून, आधारकार्ड सादर केले नाही तर शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार नाही, असा इशारा अकोला-वाशिम एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाने दिला आहे.
भारत सरकार इलेक्ट्रॉनिक व माहिती तंत्रज्ञान विभागाने सर्व प्रकारच्या शिष्यवृत्तीकरिता नॅशनल स्कॉलरशिप पोर्टल तयार केले आहे. सन २0१६-१७ या वर्षात शिष्यवृत्तीचा लाभ मिळण्यासाठी अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना आधारकार्ड क्रमांकाची नोंद हीे ऑनलाइन शिष्यवृत्ती अर्जामध्ये करणे बंधनकारक केले आहे.
केंद्र शासनाकडून प्राप्त निर्देशानुसार अकोला व वाशिम जिल्ह्यातील महाविद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, उच्च माध्यमिक महाविद्यालय, जिल्हा परिषद शाळा, प्राथमिक व माध्यमिक अनुदानित व विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित सर्व शाळा, महाविद्यालयातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांचे आधारकार्ड ३0 ऑगस्ट २0१६ पर्यंत काढण्याच्या दृष्टीने सर्व शाळा व महाविद्यालयांनी कार्यवाही तत्काळ करावी, असा फतवा एकात्मिक आदिवासी प्रकल्प जिल्हा कार्यालयाने काढला आहे. ऑनलाइन अर्जामध्ये आधारकार्ड क्रमांकाची नोंद न केल्यास किंवा आधारकार्ड नसल्याने विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्यास याप्रकरणी संबंधित शाळा, महाविद्यालयांना जबाबदार धरले जाईल, असा इशाराही एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाने दिला.

Web Title: If there is no Aadhar card then there is no scholarship!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.