शेतकर्यांच्या कर्जाचे पुनर्गठण न केल्यास ताला ठोको आंदोलन
By admin | Published: June 14, 2014 08:52 PM2014-06-14T20:52:55+5:302014-06-14T23:40:53+5:30
शेतकर्यांचे कर्जाचे पुर्नगठण २१ जुनपर्यंत बँकांनी न केल्यास २२ जुन रोजी जऊळका येथील बँकेला ताला ठोको करणार असल्याचा ईशारा एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिला.
वाशिम: शेतकर्यांचे कर्जाचे पुर्नगठण २१ जुनपर्यंत बँकांनी न केल्यास २२ जुन रोजी जऊळका येथील बँकेला ताला ठोको करणार असल्याचा ईशारा समाजसेवक सुभाष देवढे यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिला.
शासनाने शेतकरी बांधवांना दिलासा देण्याचे पॅकेज नुकतेच जाहिर केले. पिडीत शेतकर्यांना सुट देण्यासाठी बँकांना शासनाच्या तिजोरीमधून २६८ कोटी रूपयाची मतद देण्यात आली आहे. तरीसुध्दा मालेगाव तालुक्यातील बहुतांश बँकांनी शेतकर्यांच्या कर्जाचे पुनर्गठण करून कर्ज देत नाही. यासंदर्भात महसुल विभागाच्या कर्मचार्यांकडून शेतकर्यांची दिशाभुल करण्यात येत आहे. या प्रकाराची महसुल विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांनी दखल घेऊन शेतकर्यांना न्याय द्यावा. शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलेला असुनही बँकेचे संचालक १५ हजार रूपये भत्ता घेऊन चिडीचुप बसले आहेत. या संचालकांना जागे करण्याचीही वेळ आता शेतकर्यांवर येऊन ठेपली आहे. शेतकरी बांधवांचे कर्ज पुर्नगठण २१ जुन पर्यंत केल्या गेले नाही तर २२ जुन रोजी जऊळका शाखेला शेतकरी बांधवांच्या उपस्थितीत ताला ठोकणार असल्याचे देवढे यांनी प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.