व्यापार्यांची तूर विक्रीस आणल्यास गुन्हे दाखल करा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2017 02:21 AM2017-08-09T02:21:29+5:302017-08-09T02:22:58+5:30
वाशिम: टोकन वाटप केलेल्या सर्व शेतकर्यांची तूर ३१ ऑगस्ट २0१७ पूर्वी खरेदी करणे आवश्यक असून त्यासाठी सर्व खरेदी केंद्रांवर खरेदीचा वेग वाढविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी मंगळवारी दिल्या. दरम्यान, खरेदी केंद्रावर शेतकर्यांची तूर विक्रीसाठी आणणार्यावर थेट गुन्हे दाखल करण्याची कारवाई करावी, असे निर्देश त्यांनी संबंधित यंत्रणांना दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क

यावेळी जिल्हा मार्केटिंग अधिकारी बी.एस. ढाकरे, विदर्भ सहकारी पणन संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग ठाकरे, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयाचे कार्यालय अधीक्षक जी.बी. राठोड यांच्यासह जिल्ह्यातील सर्व सहाय्यक निबंधक, खरेदी-विक्री संघाचे सर्व व्यवस्थापक, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी द्विवेदी पुढे म्हणाले की, विहित मुदतीत तूर खरेदीची प्रक्रिया पूर्ण करण्याच्या दृष्टीने सुट्टीच्या दिवशीही तूर खरेदी सुरु ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे तूर खरेदीला गती मिळाली असली तरी तूर खरेदीचा वेग अजून वाढविणे आवश्यक आहे. पावसाळ्याचे दिवस असल्याने शेतकर्यांकडे असलेली तूर लवकरात लवकर खरेदी करण्याच्या दृष्टीने सर्व खरेदी केंद्रांवर प्रयत्न होणे आवश्यक आहे.
खरेदी केलेली तूर साठवण्याचा प्रश्न मिटला असून तूर खरेदीला गती द्या, व्यापार्यांची तूर कोणत्याही केंद्रावर खरेदी होणार नाही, याची दक्षता घ्या. तसेच व्यापार्याची तूर विक्रीस आणणार्या व्यक्तीवर जागीच गुन्हा दाखल करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकार्यांनी यावेळी दिल्या.