शिवरायांना जाणल्यास समस्यांची उत्तरे मिळतील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 05:18 AM2021-03-04T05:18:18+5:302021-03-04T05:18:18+5:30
अध्यक्षीय भाषणातून माँ जिजाऊ यांच्या माहेर परिसरात आपण राहतो, हे आपले भाग्य असल्याचे डॉ.जे. बी. देव्हडे यांनी सांगितले. प्रास्ताविकातून ...
अध्यक्षीय भाषणातून माँ जिजाऊ यांच्या माहेर परिसरात आपण राहतो, हे आपले भाग्य असल्याचे डॉ.जे. बी. देव्हडे यांनी सांगितले. प्रास्ताविकातून इतिहास विभाग प्रमुख डॉ. श्रीहरी पितळे यांनी शिवराय हे आदर्श व्यक्तिमत्त्व असल्याचे सांगितले. पाटील म्हणाले की, कोणतीही सूट किंवा अनुदान न देता शिवशाहीतील लोक सुखी होते, कारण राजा जाणता होता. बलात्कारी, भ्रष्टाचारी लोकांना शिवरायांनी कडक शासन केले होते. तीन वर्षे पुरेल इतके धान्य आणि पगारासाठी निधी त्यांच्याकडे केव्हाही संचित असायचा. ज्याला माणसे जपता येतील, त्यालाच राष्ट्र उभे करता येते. चारित्र्यसंपन्न राजा असेल तरच देश संपन्न होऊ शकतो. त्यामुळे स्वराज्याचे तोरण हेच आमचे धोरण असले पाहिजे, असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे संचालन अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. प्रवीण हाडे यांनी केले. आभार प्रदर्शन मराठी विभाग प्रमुख प्रा. केशव कोकाटे यांनी केले.