मंगरुळपीर बसस्थानकावरील गटाराकडे दुर्लक्ष;  प्रवाशांचे आरोग्य धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 04:21 PM2018-06-29T16:21:50+5:302018-06-29T16:23:51+5:30

वाशिम: मंगरुळपीर येथील बसस्थानक इमारतीच्या परिसराला घाणीचा विळखा बसला आहे. बसस्थानकाच्या पुढील आणि मागील बाजुला पावसाच्या पाण्यामुळे गटार साचली असल्याने जंतूसंसर्ग आणि दुर्गंधीमुळे प्रवाशांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.

Ignore the drainage at Mangrolpir Bus Station | मंगरुळपीर बसस्थानकावरील गटाराकडे दुर्लक्ष;  प्रवाशांचे आरोग्य धोक्यात

मंगरुळपीर बसस्थानकावरील गटाराकडे दुर्लक्ष;  प्रवाशांचे आरोग्य धोक्यात

Next
ठळक मुद्देमंगरुळपीर हे शहर यवतमाळ-नांदेड, नागपूर-औरंगाबाद, पुसद-अकोला या महत्त्वाच्या मार्गावर आहे.प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन बसस्थानक प्रशासनाने या ठिकाणी सोयीसुविधा उपलब्ध करून परिसर स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे. बसस्थानकात प्रवेश करण्याच्या मार्गावर आणि इमारतीच्या मागील बाजूस मोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यात पावसामुळे दरवर्षी गटार तयार होते.

लोकमत न्यूज नेटवर्क

वाशिम: मंगरुळपीर येथील बसस्थानक इमारतीच्या परिसराला घाणीचा विळखा बसला आहे. बसस्थानकाच्या पुढील आणि मागील बाजुला पावसाच्या पाण्यामुळे गटार साचली असल्याने जंतूसंसर्ग आणि दुर्गंधीमुळे प्रवाशांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. तथापि, बसस्थानक प्रशासन किंवा बसस्थानक प्रमुखांकडून हे गटार बुजविण्याची तसदी घेत नसल्याचे दिसत आहे.

मंगरुळपीर हे शहर वाशिम जिल्ह्यातून जाणाºया यवतमाळ-नांदेड, नागपूर-औरंगाबाद, पुसद-अकोला या महत्त्वाच्या मार्गावर आहे. साहजिकच या ठिकाणाहून औरंगाबाद, नागपूर, पुणे, नांदेड, हिंगोली, यवतमाळ, अमरावती, वर्धा यासह इतर ठिकाणी जाणाºया राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी)च्या अनेक बसफेºया मंगरुळपीरमार्गेच धावतात. त्यामुळेच येथील बसस्थानकावर उपरोक्त गावांकडे जाणारे शेकडो प्रवासी येथील बसस्थानकावर प्रतिक्षा करीत असतात. प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन बसस्थानक प्रशासनाने या ठिकाणी सोयीसुविधा उपलब्ध करून परिसर स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे; परंतु त्याची फारसी काळजी घेतली जात नाही. तसे काही दिवसांपूर्वी बसस्थानकावर नव्याने पंखे बसविण्यासह इतर कामे करण्यात आली; परंतु साफसफाईबाबत येथे प्रचंड उदासीनता दिसत आहे. सुसज्ज अशा बसस्थानक इमारत परिसरात घाणीचे साम्राज्य आहे. बसस्थानकात प्रवेश करण्याच्या मार्गावर आणि इमारतीच्या मागील बाजूस मोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यात पावसामुळे दरवर्षी गटार तयार होते. सतत पाऊस पडल्यानंतर या गटारातील साचलेल्या पाण्याला दुर्गंधी सुटते. तसेच जंतूही वातावरणात पसरतात. त्यामुळे येथे बसची प्रतिक्षा करीत असलेल्या प्रवाशांच्या आरोग्याला त्यापासून धोका आहे. ही बाब लक्षात घेऊन बसस्थानक वा आगार प्रमुखांनी ही गटारे तात्काळ बुजवावी, अशी मागणी केली जात आहे.  

Web Title: Ignore the drainage at Mangrolpir Bus Station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.