शौचालय वापराकडे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:27 AM2021-06-20T04:27:32+5:302021-06-20T04:27:32+5:30
00००००००० मानोरा तालुक्यात आढळला एक रुग्ण वाशिम : मानोरा शहरात शनिवार, १९ जून रोजी एकही रुग्ण आढळला नाही तर ...
00०००००००
मानोरा तालुक्यात आढळला एक रुग्ण
वाशिम : मानोरा शहरात शनिवार, १९ जून रोजी एकही रुग्ण आढळला नाही तर ग्रामीण भागात मोहगव्हाण येथील एका जणाचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. कोरोनाचा आलेख खाली येत असल्याने नागरिकांना दिलासा मिळत आहे.
०००००
स्मशानभूमी शेडचा अभाव
वाशिम : वाशिम तालुक्यातील दगड उमरा यासह अनेक गावांत अंत्यविधी उरकण्यासाठी स्मशानभूमी शेडच नाही. त्यामुळे मृत व्यक्तीवर उघड्या जागेतच अंत्यसंस्कार पार पाडावे लागत आहेत. आता पावसाळ्याचे दिवस असल्याने किमान शेडची व्यवस्था करण्याची मागणी होत आहे.
०००००
चिखली परिसरात पेरणी पूर्णत्वाकडे
वाशिम : रिसोड तालुक्यातील चिखली परिसरातील खरीप हंगामातील पेरणी पूर्णत्वाकडे येत आहे. यंदाही सोयाबीनचा सर्वाधिक पेरा होत आहे.
०००
बालविवाहासंबंधी माहिती देण्याचे आवाहन
वाशिम : जिल्ह्यात २०२१ मध्ये काही बालविवाह रोखले आहेत. यापुढेही जिल्ह्यात कुठेही बालविवाह होत असल्यास ‘चाईल्ड लाईन’च्या १०९८ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून नागरिकांनी माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास विभागाने केले.