पीक नुकसानीच्या सर्वेक्षणाबाबत आमदारांच्या सुचनेकडे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2017 07:15 PM2017-09-10T19:15:01+5:302017-09-10T19:15:21+5:30
वाशिम: आमदार राजेंद्र पाटणी यांनी मानोरा तालुक्यातील इंझोरीसह इतर ठिकाणच्या सोयाबीन मुग, उडीद, पिकांची ५ सप्टेंबर रोजी पाहणी केली. यावेळी सोयाबीन झाडाला शेंगाच दिसल्या नसल्याने शेतकºयाविषयी चिंता व्यक्त करीत उपविभागीय अधिकाºयांशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून तालुक्यातील सर्व शेतकºयांच्या पिकांचे सर्वे करण्याच्यासस सुचना त्यांनी दिल्या; परंतु आता पाच दिवस उलटले तरी, प्रशासनाने आमदारांच्या सुचनेची दखल घेऊन पीक पाहणी केली नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क

मानोरा तालुक्यात यंदा कमी पाऊस झाला. यामुळे शेतकºयांनी कशीबशी केलेली पेरणी उलटली. दरम्यान, काही उगविलेल्या बियाण्यांची वाढही झाली, मात्र याच पावसामुळे या उभ्या पिकांना मालधारणाच झाली नाही. त्यातच मागील महिनाभरापासून पावसाने दडी मारली असून, सद्यस्थितीत उन्हाळ्यासारखे कडक उन्ह तापत असल्याने शेतामधील उभी पिके सुकत आहेत. त्यातच सोयाबीनच्या झाडांगा शेंगाही लागल्या नाहीत. याबाबत शेतकºयांच्या तक्रारीनुसार आमदार राजेंद्र पाटणी यांनी भाजपा कार्यकर्ते अजय जयस्वाल उपसरपंच रवि काळेकर, नरेश आसावा, तसेच शेतकरी राधेशाम ठोक, दामोदर लांडगे, अजनी येथील किशोर चिपडे, गोपाल ठाकरे, ठाकरे आदि शेतकºयांसह इंझोरीसह मानोरा तालुक्यातील काही शेतकºयांच्या शेतांना भेटी देऊन पिकाची केली. त्यावेळी पीक परिस्थिती बिकट असल्याचे त्यांना दिसले. त्यामुळे आमदार पाटणी यांनी कारंजा-मानोराच्या उपविभागीय अधिकाºयांशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधना आणि इंझोरीसह मानोरा तालुक्यातील पिकांची पाहणी करण्याच्या सूचना दिल्या; परंतु अद्यापही प्रशासनाने ही पीक पाहणी केली नाही.