अकृषक न करता जमिनीच्या वापरात अवैध बदल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:38 AM2021-03-07T04:38:53+5:302021-03-07T04:38:53+5:30
जमीन अधिकृतरीत्या अकृषक न करता वापरात बदल केल्याप्रकरणी जमीन महसूल म्हणून कारंजा तहसील कार्यालयाने थकबाकीदारांना ८ जानेवारी, तसेच २२ ...
जमीन अधिकृतरीत्या अकृषक न करता वापरात बदल केल्याप्रकरणी जमीन महसूल म्हणून कारंजा तहसील कार्यालयाने थकबाकीदारांना ८ जानेवारी, तसेच २२ जानेवारी २०२१ रोजी नोटीस जारी केली होती. त्यानंतरही थकबाकी धारकांनी रक्कम न भरल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले. त्यात बाबत जगन्नाथ लक्ष्मण बग्गीकर, बबन लक्ष्मण बग्गीकर रा. कारंजा यांनी १ लाख १९ हजार ४२८ रुपये, राहुल सुभाषचंद्र इगोले यांनी २९ लाख २ हजार ८७८, अल्पेश प्रदीप कुमार नाग्रेचा, अश्रफ खान अफझल खान, अमर अब्दुल अन्सारी यांनी २ लाख २५ हजार ५०४, मोहम्मद इमरान मोहम्मद शफी पुंजानी यांनी ९ लाख ५८ हजार ३९२, मोहम्मद इमरान मोहम्मद शफी पुंजाणी यांनी ६ लाख ६० हजार ८५२, अब्दुल सत्तार हा. अहमद, मिनहाज युसुफ नागवणी, म. कैसर अ. रज्जाक मो. इस्माईल हा. अहमद यांनी २६ लाख १९ हजार ४३२, तसेच मोहम्मद आरिफ यांनी १४ लाख ६६ हजार १०० रुपये मिळून एकूण १ कोटी २५ हजार रुपये जमीन महसुलाची मागणी थकविली आहे. याबद्दल त्यांना कारवाईची नोटीस बजावण्यात आली आहे. तहसीलदार धीरज मांजरे यांच्या आदेशानुसार प्रभारी तहसीलदार ढोबळे व कारंजा महसूल विभागातील कर्मचाºयांनी ही कारवाई केली. दरम्यान, यातील काही थकीतदारांनी काही रक्कम भरली आहे.