कारंजा येथे अवैध दारू अड्ड्यांवर छापे; सहा लाखांचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 03:40 PM2018-10-10T15:40:43+5:302018-10-10T15:40:51+5:30
वाशिम : कारंजा शहर व परिसरातील विविध भागात सुरू असलेल्या अवैध दारू अड्ड्यांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने १० आॅक्टोबरला सकाळच्या सुमारास छापे टाकले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : कारंजा शहर व परिसरातील विविध भागात सुरू असलेल्या अवैध दारू अड्ड्यांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने १० आॅक्टोबरला सकाळच्या सुमारास छापे टाकले. या धाडीत सहा लाख ३४ हजार ५२० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
कारंजा येथील गवळीपुरा भागात अवैध हातभट्टी दारू विक्री व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाल्यावरून १० आॅक्टोबरला कारंजा येथील चार ठिकाणी धाडी टाकून मोहाचा सडवा, हातभट्टीची दारू व इतर साहित्य असा मुद्देमाल जप्त केला. कासम कालू निनसूरवाले (५५), छट्टू रमजान नौरंगाबादी (६५), आसिफ जुम्मा चैधरी (२५), चांद मदन गारवे (४०) सर्व रा. गवळीपुरा कारंजा यांच्या अवैध दारू अड्डयावर छापा मारून कासम निनसुरवाले यांचेकडून चार लाख ३२ हजार ५२०, छट्टू नौरंगाबादी यांच्याकडून ८१ हजार ५००, असिफ चौधरी यांच्याकडून ६० हजार ५०० व चांद गारवे यांच्याकडून ४० हजार रूपयांचा मोहाचा सडवा हातभट्टी दारू व इतर साहित्य असा एकुण ६ लाख १४ हजार ५२० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर प्रकरणी मुंबई दारूबंदी कायदा 65 ई व क नुसार पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. ही कारवाई जिल्हा पोलिस अधिक्षक मोक्षदा पाटील यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शिवा ठाकरे, सहायक पोलिस निरीक्षक अतुल मोहनकार, पोलिस उपनिरीक्षक दिनकर गोरे यांच्यासह पोलीस कर्मचाºयांनी पार पाडली.