अवैध दारु धंदे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या रडारवर; १.९५ लाखाचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 03:35 PM2018-08-18T15:35:35+5:302018-08-18T15:38:01+5:30
वाशिम : जिल्हयात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्यावतिने अवैध हातभट्टी, अवैध देशी , विदेशी दारु धंदयावर विभागाच्यावतिने मोहीम राबविण्यात आली. यामध्ये १.९५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन आरोपी फरार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्हयात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्यावतिने अवैध हातभट्टी, अवैध देशी , विदेशी दारु धंदयावर विभागाच्यावतिने मोहीम राबविण्यात आली. यामध्ये १.९५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन आरोपी फरार आहेत.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे राजेश कावळे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क विभाग वाशिमचे निरिक्षक, दुय्यम निरिक्षक वाशिम व मंगरुळपीर यांनी १४ आॅगस्टपासून धाडसत्रास सुरुवात केली. यावेळी मालेगाव तालुक्यातील मेडशी, जऊळका व कारंजा तालुक्यातील धनज बु. , धनज खु. या सहा ठिकाणी धाडी टाकण्यात आल्यात. या धाडीत आढळलेल्या ६ जणांवर गुन्हे नोंदवून महाराष्टÑ दारु बंदी कायदा १९४९ चे कलम ६४ अ, ई, एफ ८०, ८१ आणि ८३ नुसार एकूण सात आरोपीस समजपत्र देवून सोडून देण्यात आले. यामध्ये गजानन सखाराम चोंडकर, युसूफ खॉ छोटे खॉ पठाण, श्रीकृष्ण चंपत गवई, अरुण मारोतराव इंगळे यांचा समावेश आहे. तर संजय गणपत खरबळकर व गजानन विठ्ठल इंगळे हे दोन आरोपी फरार आहेत. तसेच मनोज प्रकाश चव्हाण यांचेकडे परराज्यातील विदेशी मद्याचा साठा मिळून आल्याने त्यास अटक करुन ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपिंकडून एकूण १ लाख ९५ हजार ८११ रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन घटनास्थळीच नाश करण्यात आला. यामध्ये ४० लिटर गावठी दारु, १८० मि.ली.च्या देशी दारुच्या एकूण २१६० सिलबंद बाटल्या, परराज्यातील मद्य १८० मिलीच्या १७९ सिलबंद बाटल्या व ९० मिलीच्या ५३५ सिलबंद बाटल्या जप्त केल्यात. तसेच एकूण ८२५ लिटर मोहसडवा घटनास्थळीत नाश करण्यात आला. सदर कारवाई निरिक्षक अशोक साळोंखे, वाशिम व मंगरुळपीरचे दुय्यम निरिक्षक एम.के. उईके, वाशिम सहायक दुय्यम निरिक्षक रंजीत आडे, जवान नितिन चिपडे, डी.डी. राठोड, ललित खाडे, स्वप्निल लांडे, निवृत्ती तिडके, सुभाष उमडे, महिला पोलीस शिपाई आशा बहाळे , वाहन चालकासह कर्मचाºयांचा सहभाग होता.