अवैध सावकारीप्रकरणी कारंजात धाडी ; एक कोटीपेक्षा जास्त व्यवहाराचे ६३ स्टॅम्प पेपर जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2019 04:56 PM2019-01-04T16:56:00+5:302019-01-04T16:56:19+5:30
वाशिम : अवैध सावकारीसंदर्भात प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने सहकार विभागाने ४ जानेवारीला कारंजा येथे एका अवैध सावकाराच्या घर व प्रतिष्ठावर टाकलेल्या धाडीत १ कोटीपेक्षा जास्त व्यवहाराचे ६३ खरेदी खत, मुद्रांक शुल्क जप्त करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : अवैध सावकारीसंदर्भात प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने सहकार विभागाने ४ जानेवारीला कारंजा येथे एका अवैध सावकाराच्या घर व प्रतिष्ठावर टाकलेल्या धाडीत १ कोटीपेक्षा जास्त व्यवहाराचे ६३ खरेदी खत, मुद्रांक शुल्क जप्त करण्यात आले.
कारंजा शहरात अवैध सावकारीचा व्यवसाय केला जात असल्याच्या पृष्ठभूमीवर जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या मार्गदर्शनात आणि जिल्हा उपनिबंधक रमेश कटके यांच्या योजनेनुसार सहायक निबंधक परेश गुल्हाने यांच्या नेतृत्वात तीन पथकामार्फत कारंजा येथील प्रशांत प्रल्हाद दानेज व प्रल्हाद यादरवसा दानेज यांचे घर व त्यांच्या प्रतिष्ठानावर धाडी टाकण्यात आल्या. यावेळी त्यांच्याकडून अवैध सावकारीचे एकूण ६३ खरेदी खताचे मुद्रांक, सावकारीबाबत डायरी तसेच इतर संशयित दस्तावेज सापडले आहेत. एकूण तीन पथकातील ३५ कर्मचाºयांनी सकाळी १० वाजतापासून सायंकाळपर्यंत धाडसत्र राबवून अवैध दस्तऐवजाच्या नोंदी तसेच इतर संशयास्पद कागदपत्रे हस्तगत करण्यात यश मिळविले. महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ चे कलम १५ व १६ नुसार सहकाय निबंधकांमार्फत पुढील तपास सुरू असून, तपासाअंती अवैध सावकाराविरूद्ध पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे जिल्हा उपनिबंधक रमेश कटके यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
या पथकात पोलीस विभागाचे कर्मचारी टी.जी. भोयर, एच.पी. चोपडे, राठोड, जी.पी. सिरसाट, एस.जी.नाईक, ए.पी. पत्रे तसेच जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील आर.एल. गडेकर, बनसोडे, जी.बी. राठोड, ए.एम. सारवे, बी.एन. गोदमले, एस.व्ही. राठोड, एस.पी. फुके, के.पी. भुस्कडे, एस.पी. सांगळे, एस.जी. गादेकर, केसरी राठोड, जिल्हा देखरेख संघाचे गटसचिव एस.एस. जाधव, एस.पी. लळे, आर.एस. वानखडे, व्ही.आर. इंगळे, डी.व्ही. हळदे, एच.पी. मोहकार यांचा समावेश होता.
अवैध सावकारी व्यवसायाच्या पार्श्वभूमीवर कारंजा येथील ाील प्रशांत प्रल्हाद दानेज व प्रल्हाद यादरवसा दानेज यांचे घर व त्यांच्या प्रतिष्ठानावर तीन पथकामार्फत धाडी टाकण्यात आल्या. यावेळी त्यांच्याकडून अवैध सावकारीचे एकूण ६३ खरेदी खताचे मुद्रांक, सावकारीबाबत डायरी तसेच इतर संशयित दस्तावेज सापडले आहेत. तपासाअंती पुढील कार्यवाही केली जाणार आहे.
-रमेश कटके, जिल्हा उपनिबंधक, वाशिम