वाशिम जिल्ह्यात अवैध प्रवासी वाहतूकीचा प्रश्न झाला गंभीर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2019 04:52 PM2019-01-09T16:52:51+5:302019-01-09T16:53:14+5:30
वाशिम : दिवसागणिक वाढत चाललेले रस्ते अपघात व त्यात होणाऱ्या जीवीतहानीवर नियंत्रण मिळविण्यासाठी क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्याचे सक्त निर्देश जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी ४ जानेवारीच्या रस्ता सुरक्षा समितीच्या सभेत दिल्या. मात्र, या निर्देशांची रोजरोस पायमल्ली सुरूच असून क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक केली जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

रस्ते अपघातांवर नियंत्रण मिळविण्याकरिता विविध माध्यमातून प्रयत्न होणे आवश्यक आहे. त्यानुसार, शिक्षण विभागामार्फत शाळा-महाविद्यालयांमध्ये वाहतूक नियमांविषयी जनजागृती करण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या असून प्रामुख्याने अल्पवयीन वाहनचालकांवर होणाºया कारवाईबाबत माहिती देण्यात यावी. वाहतूक नियमांविषयी जनजागृती होत असताना वाहतूक नियम मोडणाऱ्यांविरुद्ध मोहीम सुद्धा तीव्र करण्यात यावी. तसेच वाहतूक पोलीस व परिवहन विभागाच्यावतीने संयुक्तरित्या विशेष तपासणी मोहीम राबवून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाºयांवर कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या आहेत. मात्र, शिक्षण विभाग, पोलिस विभाग, वाहतूक विभाग यापैकी कुणीच जिल्हाधिकाºयांचे निर्देश फारसे गांभीर्याने घेतलेले नाहीत. त्यामुळे आजही राजरोसपणे वाहतुकीचे नियम तोडण्यासोबतच अवैध प्रवासी वाहतूकीचा प्रकारही फोफावल्याचे दिसून येत आहे.