पूस नदीपात्रातून अवैध वाळू उपसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 01:28 PM2019-01-12T13:28:56+5:302019-01-12T13:29:15+5:30
कोंडाळा महाली (वाशिम) : परिसरातील आसोला जहागीरनजिक पूस नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा करण्यात येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
कोंडाळा महाली (वाशिम) : परिसरातील आसोला जहागीरनजिक पूस नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा करण्यात येत आहे. जिल्हाधिकाºयांचे आदेश दुर्लक्षीत करून प्रशासनाच्या डोळ्यांत धुळफेक करीत वाळू तस्कर हा प्रकार करीत आहेत.
जिल्ह्यातील कुठल्याही वाळू घाटाचा लिलाव झाला नसून, नदीपात्रातूनही वाळू उपसा करण्यावर बंदी घालण्यात आलेली आहे. त्यामुळे कोणत्याही ठिकाणचा वाळू उपसा करणे नियमबाह्य ठरत असतानाही आसोला जहागीर परिसरातून वाहणाºया पूस नदीच्या पात्रातून वाळू तस्कर दरदिवशी शेकडो ब्रास वाळूचा उपसा करून शासनाचा महसूल बुडवित आहे. त्यातच या वाळू उपशामुळे नदीपात्रातील खडक उघडा पडून पर्यावरणाला धोक्यात येण्यासह जलचरांचे अधिवासही नष्ट होत आहेत. पूस नदीतून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होत असतानाही महसूल प्रशासन मात्र, या प्रकाराबाबत पूर्णपणे अनभिज्ञ असल्याने वाळू तस्करांचे चांगलेच फावत आहे. या प्रकारावर नियंत्रण ठेवण्यासाठी महसूल प्रशासनाच्या अधिकारी, कर्मचाºयांनी नदीपात्राची पाहणी करावी, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थ आणि पर्यावरण प्रेमींच्यावतीने करण्यात येत आहे.