जंगलातील सागवान वृक्षांची अवैध कत्तल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 03:20 PM2018-11-19T15:20:30+5:302018-11-19T15:20:57+5:30
वाशिम: तालुक्यातील शिरपुटी बिट अंतर्गत येणाºया शेलगाव घुगे येथील जंगलात सागवान वृक्षांची मोठ्या प्रमाणात कत्तल करण्यात येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: तालुक्यातील शिरपुटी बिट अंतर्गत येणाºया शेलगाव घुगे येथील जंगलात सागवान वृक्षांची मोठ्या प्रमाणात कत्तल करण्यात येत आहे. वनविभागाच्या कर्मचाºयांचे मात्र, या प्रकाराकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे.
दिवसेंदिवस ढासळणारा पर्यावरणाचा समतोल लक्षात घेऊन राज्य शासन ५० कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्नरत असून, या अभियानांतर्गत जिल्ह्यात गत दोन वर्षांत २५ लाख वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. आता या वृक्षांचे संवर्धन होणे अपेक्षीत आहे; परंतु लागवड केलेल्या वृक्षांचे संगोपन होत नाहीच, उलट जंगलातील मोठमोठे वृक्ष तोडण्याचे प्रकार सुरू आहेत. वाशिम तालुक्यातील शिरपुटी अंतर्गत येणाºया शेलगाव घुगे येथील जंगलात हा प्रकार पाहायला मिळत आहे. या जंगलातील सागवान वृक्षांची कत्तल बिनदिक्कत करून पर्यावरणाचा ºहास करण्यात येत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरू असताना वनरक्षक किंवा इतर वनकर्मचारी जंगलाकडे फिरकून पाहत नाहीत. त्यामुळे अवैध वृक्षतोड करणाºयांना मोकळे रान मिळाले आहे.